वर्ध्याच्या महावीरने बांगलादेशात मैदान गाजवलं, हा खेळ खूप कमी लोकांना माहितीय!

Last Updated:

बांगलादेशातील ढाका येथे झालेल्या सॅम्बो आशियन चॅम्पिनयशिपमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी मोठं यश मिळवलंय.

+
वर्ध्याच्या

वर्ध्याच्या महावीरने रशियात मैदान गाजवलं, हा खेळ खूप कमी लोकांना माहितीय!

वर्धा, 11 नोव्हेंबर: अनेक तरुणांना वेगवेगळ्या खेळ प्रकारांबद्दलचा आकर्षण असतं. सॅम्बो हा खेळ मार्शल आर्ट्स प्रकारामध्ये खेळला जातो. नुकतेच सेकंड साउथ एशियन सॅम्बो चॅम्पियनशिप ढाका बांगलादेश येथे पार पडल्या. या स्पर्धेत वर्ध्यातील कॉम्बॅक्ट खेळाडू महावीर वासुदेवराव वरहारे यांनी -98 किलो वजन गटामध्ये खेळून भरताला रौप्य पदक प्राप्त करून दिलंय. त्यांच्याकडूनच आपण या खेळाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
काय आहे हा खेळ?
हा खेळ मार्शल आर्ट या प्रकारात मोडतो. हॅन्ड टू हॅन्ड हा कॉम्बॅक्ट खेळला जातो. या खेळाचा उगम रशियात झाला असून रशियातील आर्मी हा खेळ खेळतात. भारतातील जवळजवळ 28 राज्यांमधील खेळाडू हा खेळ खेळतात. मिक्स मार्शल आर्ट मध्ये हा गेम खेळला जातो. या खेळात ज्युनियर, सब ज्युनिअर, आणि सीनियर असे गट असतात आणि वजन गटानुसार स्पर्धा घेतली जाते. अठरा वर्षांच्या आतील मुलं ज्युनिअर मध्ये येतात. त्यावरील सीनियर गटामध्ये येतात, असे खेळाडू वरहारे सांगतात.
advertisement
स्पर्धक कसे करतात तयारी ?
दररोज पाच ते सहा किलोमीटर रनिंग, शरीराचा स्टॅमिना वाढविण्यासाठी व्यायाम केला जातो. तसेच दिवसातून सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास असा वेळ तयारीसाठी दिला जातो. किकिंग, पँचिंग, थ्रोइंग, सबमिशन, वजन याकडे लक्ष देऊन प्रॅक्टिस केली जाते, असे खेळाडू वरहारे सांगतात.
advertisement
स्पर्धकात कोणत्या क्षमता असणे आवश्यक?
सॅम्बो हा खेळ खेळणारे स्पर्धक मेंटली आणि फिजिकली अत्यंत स्ट्रॉंग असावे लागतात. वेळेत जेवण आणि योग्य व्यायाम अशा महत्त्वाच्या गोष्टी पाळाव्या लागतील, असे वरहारे सांगतात.
नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धांबद्दल कसं कळतं ?
स्पर्धा जाहीर झाल्यानंतर राज्यातील सचिवांकडून स्पर्धकांना किंवा सॅम्बोचे जे खेळाडू आहेत त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचविला जातो. व्हाट्सअपच्या माध्यमातून या संदर्भात स्पर्धकांना माहिती आणि स्पर्धेची माहिती कळते. स्पर्धेची माहिती आम्हाला जवळजवळ दीड ते दोन महिन्यांच्या आधी कळते. त्यानुसार आम्ही अधिक जोमाने आमच्या तयारीला लागतो, असे खेळाडू वरहारे सांगतात.
advertisement
कशी असते जोखीम?
या खेळाच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना रिंगमध्ये जाण्याआधी तुम्हाला स्वतःला फिट ठेवणं आणि आधीपासूनच मेंटली फिट असणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर स्पर्धेच्या आधी तुम्हाला थोडा व्यायामही करावा लागतो. अन्यथा तुम्हाला जखमी होण्याची ही जास्त शक्यता असते. या खेळाबद्दल तुमच्या जिल्ह्यातील स्पोर्ट्स कोच यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती किंवा तुम्हाला खेळायचं असल्यास तुम्ही खेळू शकता. या खेळामध्ये मुलांसह मुली देखील मोठ्या हिमतीने खेळताना बघायला मिळतात. सेल्फ डिफेन्स आणि करिअर म्हणूनही या खेळाला विद्यार्थी, तरुण-तरुणी निवडू शकतात, असेही वरहारे सांगतात.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वर्ध्याच्या महावीरने बांगलादेशात मैदान गाजवलं, हा खेळ खूप कमी लोकांना माहितीय!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement