UPSC Success Story: आयपीएसचं पद मिळालं तरी समाधान होईना! कोण आहे ही 'जिद्दी' आस्था जैन? जिने तिसऱ्या प्रयत्नात अशक्य ते शक्य करून दाखवलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
UPSC Success Story: दोनदा 'UPSC' क्रॅक केली, खांद्यावर IPS ची वर्दी आली; तरीही मन मानलं नाही! किराणा दुकानदाराच्या लेकीनं तिसऱ्यांदा करून दाखवलं
यश म्हणजे केवळ रिझल्ट नाही, तर यश म्हणजे तुमचं स्वप्न पूर्ण होणं!" या ओळी शामलीच्या आस्था जैनने सत्यात उतरवून दाखवल्या आहेत. UPSC क्रॅक झाली की पेढे वाटून शांत बसतात, पण आस्था वेगळ्या मातीची बनली होती. दोनवेळा आयपीएस IPS होऊनही तिचं मन मानत नव्हतं, कारण डोळ्यांसमोर स्वप्न होतं फक्त आणि फक्त IAS होण्याचं. अखेर २०२५ च्या निकालात देशात ९ वी रँक मिळवून तिने लाल दिव्याच्या गाडीचं आपलं स्वप्न पूर्ण केलं.
किराणा दुकानातून आलेला तो एक फोन...
आस्थाचे वडील अजय कुमार जैन यांचं शामलीच्या कांधला कसब्यात एक छोटं किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते दुकानात ग्राहकांना सामान देत असतानाच फोन खणखणला. पलीकडून लेकीचा आवाज आला, "बाबा, मी माझं स्वप्न पूर्ण केलंय!" सध्या हैदराबादमध्ये आयपीएसची ट्रेनिंग घेणाऱ्या आस्थाने तिसऱ्या प्रयत्नात थेट टॉप १० मध्ये झेप घेतली होती. हे ऐकताच त्या बापाचे डोळे पाणावले, ज्यांनी आयुष्यभर काटकसर करून आपल्या तीन मुलींना शिकवलं होतं.
advertisement
IPS होऊनही का नव्हती समाधानी?
2023 मध्ये आस्थाने पहिल्या प्रयत्नात 131 वी रँक मिळवली. आयपीएससाठी निवड झाली. दुसरा प्रयत्न १८६ वी रँक मिळाली, पुन्हा समाधान मिळालं नाही. तिसरा प्रयत्न जिद्दीने अभ्यास केला आणि थेट ९ वी रँक पटकावून आयएएस होण्याचा मार्ग मोकळा केला. लोकांना एकदा नोकरी मिळाली की संघर्ष संपतो असं वाटतं, पण आस्थाला स्वतःला सिद्ध करायचं होतं. आयपीएसची खडतर ट्रेनिंग सुरू असतानाही तिने अभ्यासाचा पिच्छा सोडला नाही.
advertisement
मर्यादित साधनं, पण अथांग जिद्द
अजय जैन सांगतात की, "आम्ही सामान्य लोक आहोत, आमच्याकडे मोठ्या सुखसोयी नव्हत्या. पण आस्थाने ९ वीत असतानाच आयएएस व्हायचं ठरवलं होतं." शाळेत असतानाही ती चमकली होती; सीबीएसई १२ वीच्या परीक्षेत ती संपूर्ण देशात चौथी आली होती. तिची मोठी बहीण एमबीए करून नोकरी करतेय, तर धाकटी बहीण पुण्यातून एमबीबीएसचं शिक्षण घेत आहे. एका सामान्य व्यापाऱ्याच्या तीनही लेकींनी आज समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.
advertisement
आईचा अभिमान: "तिने यशापेक्षा स्वप्नाला महत्त्व दिलं"
आस्थाची आई ममता जैन यांच्या मते, आस्थाला लहानपणापासूनच अभ्यासाची ओढ होती. "तिला पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं होतं, पण ती त्या यशावर समाधानी नव्हती. तिला जे हवं होतं, ते मिळेपर्यंत तिने हार मानली नाही," असं त्या अभिमानाने सांगतात. आज शामलीच्या सरावज्ञान मोहल्ल्यात फक्त आस्थाच्याच नावाची चर्चा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 2:09 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
UPSC Success Story: आयपीएसचं पद मिळालं तरी समाधान होईना! कोण आहे ही 'जिद्दी' आस्था जैन? जिने तिसऱ्या प्रयत्नात अशक्य ते शक्य करून दाखवलं






