advertisement

Amazon Prime Video यूझर्सला कंपनी देऊ शकते मोठा धक्का, घेतलाय मोठा निर्णय

Last Updated:

कंपनी Amazon Prime Video यूझर्सना मोठा धक्का देणार आहे. कंपनी नेटफ्लिक्स सारखे पासवर्ड शेअरिंग बंद करणार आहे आणि यूझर्ससाठी अॅक्टिव्ह डिव्हाइसची लिमिट कमी करणार आहे.

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
मुंबई : Netflix प्रमाणे Amazon देखील आपल्या प्राइम व्हिडिओ यूझर्सना मोठा धक्का देणार आहे. OTT प्लॅटफॉर्म नवीन वर्षात डिव्हाइसची लिमिट कमी करणार आहे. कंपनी कोणत्याही अतिरिक्त चार्जशिवाय अमेझॉन प्राइम यूझर्सना प्राइम व्हिडिओ आणि प्राइम म्युझिकचे सबस्क्रिप्शन ऑफर करते. एका रिपोर्टनुसार, Amazon Prime Video यूझर्स यापुढे त्यांचा पासवर्ड त्यांच्या मित्रांसोबत शेअर करू शकणार नाहीत कारण कंपनी डिव्हाइसची लिमिट कमी करणार आहे.
डिव्हाइस लिमिट कमी केली जाईल
Netflix किंवा इतर OTT ॲप्सप्रमाणे, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ यूझर्स आता पूर्वीपेक्षा कमी डिव्हाइसमध्ये एकाच वेळी लॉग इन करू शकतील. टिपस्टर इशान अग्रवालच्या म्हणण्यानुसार, ॲमेझॉनने डिव्हाइसची लिमिट निम्मी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या, Amazon प्राइम व्हिडिओ यूझर्स एकाच वेळी 10 डिव्हाइसवर OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकतात. आगामी काळात त्याची लिमिट 5 पर्यंत कमी करण्यात येणार आहे. याशिवाय, यूझर्स केवळ दोन स्मार्ट टीव्हीवर प्राइम व्हिडिओ ॲपमध्ये लॉग इन करू शकतील.
advertisement
इतर OTT ॲप्स प्रमाणे, यूझर्स त्यांना पाहिजे तेव्हा त्यांचे डिव्हाइस मॅनेज करु शकतील. ज्या डिव्हाइसमध्ये लॉग-इन करण्याची गरज नाही. त्या डिव्हाइसमध्ये यूझर्स लॉग-आउट करु शकतील. यापूर्वी Amazon Prime Video च्या रायवलरी प्लॅटफॉर्म Netflix ने भारतात पासवर्ड शेअररिंग संपवली होती. आता नेटफ्लिक्स यूझर्सला एकापेक्षा जास्त डिव्हाइसमध्ये लॉग-इन करण्यासाठी टेम्पररी कोडची गरज असते. फक्त Home Wi-Fi नेटवर्कने कनेक्टेड डिव्हाइसमध्येच यूझर्स Netflix अॅक्सेस करु शकतील.
advertisement
प्राइम सबस्क्रिप्शन
Amazon Prime चे ईअरली सब्सक्रिप्शन 1,499 रुपयांमध्ये येते. यामध्ये युजर्सला टीव्ही आणि मोबाईल दोन्ही डिव्हाइसमध्ये प्राइम व्हिडिओचा ॲक्सेस मिळतो. त्याच वेळी, एका महिन्याचे सबस्क्रिप्शन 299 रुपयांना आणि तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन 599 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय Amazon ने प्राइम व्हिडिओच्या मोबाईल एडिशनसह एक प्लॅन देखील लॉन्च केला आहे, ज्यामध्ये यूझर्स केवळ त्यांच्या स्मार्टफोनवर Amazon प्राइम व्हिडिओ अॅक्सेस करू शकतात.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Amazon Prime Video यूझर्सला कंपनी देऊ शकते मोठा धक्का, घेतलाय मोठा निर्णय
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement