advertisement

गुगलने लाँच केलं Gemini 2.0 व्हर्जन! यात काय आहे अडव्हान्स, लगेच घ्या जाणून

Last Updated:

गुगलने आता त्याच्या जनरेटिव्ह एआय जेमिनीचं व्हर्जन 2.0 लाँच केलंय. त्यामुळे एआय आता मानवी विचारांच्या पलीकडे गेलंय.

गुगल जेमिनी
गुगल जेमिनी
मुंबई : स्मार्टफोन किंवा इंटरनेट वापरणाऱ्या जवळपास प्रत्येकानचं गुगल कंपनीचं नाव ऐकलं असेल. अनेकदा एखादी माहिती शोधण्यासाठी गुगलचा वापर कर, असा सल्लाही दिला जातो. बदलत्या काळानुसार गुगलनं जेमिनी आर्टिफिशियल इंटिलिजन्स अर्थात जेमिनी एआय ही सेवादेखील लाँच केली आहे. हे वापरताना हवी त्या प्रश्नांची उत्तरं, हवी ती माहिती सहज मिळवता येऊ लागली आहे. पण आता गुगलनं जेमिनी 2.0 व्हर्जन लाँच करत एआय टेक्नॉलॉजीत एका नव्या क्रांतीच्या दिशेनं पाऊल टाकलंय.
गुगलने आता त्याच्या जनरेटिव्ह एआय जेमिनीचं व्हर्जन 2.0 लाँच केलंय. त्यामुळे एआय आता मानवी विचारांच्या पलीकडे गेलंय. ते मानवी मदतीशिवाय स्वत:हून सहज निर्णय घेऊ शकतं. गुगलच्या ब्लॉग पोस्टनुसार, कंपनीने जेमिनी 2.0 अशा प्रकारे तयार केलंय की, ते मल्टीमोडॅलिटीमध्ये खूपच उत्तम आहे. भविष्याचा विचार करून तयार करण्यात आलेलं गुगलचं हे आतापर्यंतचं सर्वात प्रगत एआय मॉडेल आहे.
advertisement
जेमिनी 2.0 सोबतच गुगलने त्यांच्या सर्चमध्ये सुधारणा करण्यासाठी केलेल्या विविध कामांचा उल्लेख ब्लॉग पोस्टमध्ये केलाय. त्यानुसार, जेमिनी 2.0 फक्त निवडक डेव्हलपर्स आणि टेस्टर्ससाठी उपलब्ध असेल. लवकरच ते गुगलच्या इतर प्रॉडक्टमध्ये देखील इंटिग्रेट केलं जाईल. सर्वात अगोदर ते जेमिनी आणि गुगल सर्च यात इंटिग्रेट केलं जाईल. यासोबतच गुगलने जेमिनी 2.0 फ्लॅश देखील लाँच करण्याची घोषणा केलीय. हे सर्व जेमिनी युजर्सना वापरता येईल. ते एक एक्सपेरिमेंटल मॉडेल असेल. या सोबतच कंपनीने ‘डीप रिसर्च’ फीचर देखील लाँच केलंय.
advertisement
काय आहे डीप रिसर्च फीचर?
डीप रिसर्च फीचर हे एक रिसर्च असिस्टंट म्हणून काम करेल. जे प्रगतशील तर्क आणि दीर्घ संदर्भ वापरून रिचर्स करेल. हे फीचर जेमिनी ॲडव्हान्स्डवर उपलब्ध करून देण्यात आलंय. या फीचरच्या मदतीने अनेक क्लिष्ट आणि अवघड विषयांवर चांगला रिसर्च केला जाईल. कोणत्याही व्यक्तीच्या मदतीशिवाय एक चांगला रिपोर्ट तयार करण्याचं काम या फीचरच्या मदतीने होईल.
advertisement
स्वतःच निर्णय घेणार एआय
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं की, ‘कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जेमिनी फर्स्ट जनरेशन लाँच केलं होतं. आता या वर्षी जेमिनीचं सेकंड जनरेशन लाँच केलंय. जेमिनी 2.0 ची रचना ‘एजंटिक एरा’ म्हणजे ज्या वेळी मानवी हस्तक्षेपाची फारशी गरज लागणार नाही, अशा काळासाठी केली आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने एआय टूल्स डेव्हलप करण्यासाठी मोठी गुंतवणूक केलीय. मानवी विचारापेक्षा अनेक पावलं पुढं जाऊन हे एआय काम करेल. स्वतःच योग्य निर्णय घेऊन त्यावर काम करेल. पण हे सर्व तुमच्या देखरेखीमध्येच होईल. जेमिनी 2.0 तशाच पद्धतीने काम करेल.’
advertisement
एआय टेक्नॉलॉजीमध्ये गेल्या काही काळात वेगाने प्रगती होत असून, जेमिनी एआयचा वापरही वाढत आहे. त्यातच आता जेमिनी 2.0 व्हर्जन आल्यानं त्याचा आता युजर्सना खूपच फायदा होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
गुगलने लाँच केलं Gemini 2.0 व्हर्जन! यात काय आहे अडव्हान्स, लगेच घ्या जाणून
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement