Black Friday Sale: कुणालाच विश्वास बसणार नाही, इथं 1 रुपयापेक्षा कमी किंमतीत मिळतोय iPhone 16, पण..

Last Updated:

सध्या अशीच एक ऑफर जाहीर करण्यात आली आहे. ती प्रथमदर्शनी खोटी वाटते; मात्र ती खरी आहे. या ऑफरमध्ये आयफोन 16 चक्क एक रुपयापेक्षा कमी किमतीत खरेदी करणं शक्य आहे.  

News18
News18
मुंबई : सोशल मीडियावर बऱ्याच ऑफर्सच्या जाहिराती येत असतात. त्यात काही अविश्वसनीय जाहिरातीही असतात. त्यांपैकी बऱ्याचशा ऑफर्स खोट्या असतात आणि त्यांना अनेक जण फसतातही. सध्या अशीच एक ऑफर जाहीर करण्यात आली आहे. ती प्रथमदर्शनी खोटी वाटते; मात्र ती खरी आहे. या ऑफरमध्ये आयफोन 16 चक्क एक रुपयापेक्षा कमी किमतीत खरेदी करणं शक्य आहे.
ही अविश्वसनीय ऑफर वाचून धक्का बसला असला, तरी एक वाईट बातमी म्हणजे भारतात त्या ऑफरचा लाभ घेता येणार नाही. अमेरिकेत बूस्ट मोबाइल या कंपनीने ब्लॅक फ्रायडे सेल जाहीर केला आहे. त्याअंतर्गत एक रुपयापेक्षा कमी किमतीत आयफोन 16 खरेदी करण्याचं डील देण्यात येत आहे. तसंच, ही ऑफर आयफोनच्या प्लस आणि प्रो मॅक्स या मॉडेल्सच्या खरेदीवरही लागू आहे. लेटेस्ट आयफोन जवळपास मोफत खरेदी करण्यासारखंच हे आहे; मात्र ही ऑफर वाटते तितकी सोपी नाही. त्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी बूस्ट मोबाइल या कंपनीच्या तीन निकषांची पूर्तता करणं गरजेचं आहे. ते निकष कोणते आहेत, याबद्दल जाणून घेऊ या.
advertisement
आपल्या देशात हा प्लॅन खूप आश्चर्यकारक वाटत असला, तरी अमेरिकेसह अन्य अनेक देशांमध्ये तो तसा नाही. तिथे अनेक ग्राहक मोबाइल ऑपरेटरशी करार करून कमी किमतीत फोन खरेदी करतात. त्यामुळे त्यांना दर महिन्याला केवळ मोबाइल ऑपरेटरचं पेमेंटच द्यावं लागतं. फोनसाठी त्यांना वेगळं शुल्क भरावं लागत नाही. काही वेळा फोनसाठी शुल्क भरावं लागतं; मात्र ते खूप कमी असतं. भारतात सध्या अशा प्रकारचा प्लॅन एअरटेल ही टेलिकॉम कंपनी देते; मात्र तो परवडण्यासारखा नाही.
advertisement
 आयफोन 16 जवळपास मोफत मिळवण्याचा हा प्लॅन नेमका कसा?
बूस्ट मोबाइल या टेलिकॉम कंपनीने आपल्या वेबसाइटवर त्याबद्दल माहिती दिली आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना बूस्ट मोबाइलच्या 36 महिन्यांच्या इन्स्टॉलमेंट प्लॅनमध्ये नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ग्राहकांना बूस्ट इन्फायनाइट वायरलेस प्लॅन घ्यावा लागेल. त्याची किंमत दरमहा 65 डॉलर्स म्हणजे 5500 रुपये असेल. म्हणजेच तेवढे पैसे दर महिन्याला कंपनीला द्यावे लागतील.
advertisement
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या तीन वर्षांच्या कालावधीत आयफोन बूस्ट मोबाइल नेटवर्कवर लॉक असेल. म्हणजेच दुसऱ्या कोणत्याही कंपनीचं सिमकार्ड त्यात चालणार नाही. म्हणजेच याचाच अर्थ असा, की एक रुपयापेक्षा कमी किमतीत आयफोन घेण्यासाठी ही कंपनी तीन वर्षांसाठी ग्राहकांना बंधनात ठेवते. ग्राहक तो वायरलेस प्लॅन या तीन वर्षांत बदलू शकत नाही. त्यामुळे कंपनीचे पैसे वसूल होतात.
advertisement
एखाद्या ग्राहकाने हा करार तीन वर्षांआधीच मोडला, तर त्याला आयफोनचं शुल्क भरावं लागतं. तसंच, निकषानुसार तीन वर्षं तो आयफोन वापरला तर ग्राहक तो पुन्हा विकू शकतो किंवा त्याबदल्यात काही पैसे मिळवू शकतो. भारतासाठी नवं वाटत असलं, तरी बाहेरच्या अनेक देशांत अशा ऑफर्स असतात.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Black Friday Sale: कुणालाच विश्वास बसणार नाही, इथं 1 रुपयापेक्षा कमी किंमतीत मिळतोय iPhone 16, पण..
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement