सलाईन संपल्यावर नर्सला शोधायची गरज नाही! आता आपोआप जाणार कॉल, विद्यार्थ्यांनी बनवलं अनोखं उपकरण

Last Updated:

Technology News: रुग्णालयात सलाईन संपल्यावर बऱ्याचदा नर्सची शोधाशोध करावी लागते. पण आता छत्रपती संभाजीनगरमधील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपकरणामुळे नर्सला थेट कॉलच जाणार आहे.

+
सलाईन

सलाईन संपल्यावर नर्सला शोधायची गरज नाही! आता आपोआप जाणार कॉल, विद्यार्थ्यांनी बनवलं अनोखं उपकरण

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: रुग्णालयांत सलाईन संपल्यावर नर्सची शोधाशोध करावी लागल्याचा अनुभव अनेकांना आला असेल. परंतु, आता यावर छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तोडगा काढला आहे. विद्यार्थ्यांनी एक खास उपकरण तयार केलं असून त्यामुळे नर्सला सलाईन संपल्यावर थेट कॉलच जाणार आहे. ‘सलाईन लेव्हल मॉनिटरिंग डिव्हाईस’ असं या उपकरणाचं नाव असून त्यामुळे अनेक रुग्णालयांना फायदा होणार आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी विविध संशोधन करत असतात. एका प्रकल्पासाठी गौरी कानझोडे, राम किरगे, आकांक्षा पुंड, ओम चौधरी या विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांनी ‘सलाईन लेव्हल मॉनिटरिंग डिव्हाईस’ बनवलं आहे. यामुळे सलाईन संपत आलं की थेट नर्सना कॉल जाणार आहे. हा प्रयोग यशस्वीरीत्या पूर्णही झाला असून याची टेस्टिंगही झाली आहे. या विद्यार्थ्यांना टेक इलेक्ट्रा अतर्गत इपिटोम प्रोजेक्ट कॉम्पिटीशनमध्ये प्रथम क्रमांकही मिळाला आहे.
advertisement
“रुग्णाला सलाइन लावल्यानंतर ते संपत आले की, तिथे असणाऱ्या नातेवाइकांची नर्सला शोधण्यासाठी तारांबळ उडते. हा अनुभव जवळपास सर्वांना आलेला असतो. मग नर्स येणार, सलाइन बंद करून जाणार, अथवा दुसरे सलाइन जोडणार. परंतु, सलाइन संपत आले की, अलार्म वाजेल. याला प्रतिसाद न दिल्यास थेट नर्सलाच कॉल करणारे 'सलाइन लेव्हल मॉनिटरिंग डिव्हाईस' (उपकरण) बनविले आहे. इतकेच नव्हे तर नर्सकडूनही प्रतिसाद न मिळाल्यास थेट हायर ऑथोरिटी म्हणजे प्रमुख डॉक्टरांनाच कॉल जाणार, अशीही सुविधा या उपकरणात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
advertisement
कसं बनवलं यंत्र?
या यंत्रात अरडिनो युनो, वायफाय मोड्यूल, एलसीडी डिस्प्ले, बजर, बॅटरी या साहित्य-उपकरणांचा समावेश आहे. यामध्ये जीएसएम मॉड्यूल बसविल्याने सहजरित्या कॉल लागतो. हे उपकरण बनविण्यासाठी लोड सेल सेन्सर वापरला आहे. या सेन्सरने 'सेट' करून ठेवलेले सलाइन त्या पातळीपर्यंत पोचले की, अलार्म वाजतो. हे सर्व ऑपरेट करण्यासाठी बॅटरीजचा वापर केला आहे. महत्त्वाचे म्हणजे संगणकावर ऑनलाईन स्वरूपातही या सलाईनची पातळी दिसते. तसेच नर्सने कॉल उचलला नाहीतर डॉक्टरांचा क्रमांक ॲड करून ठेवल्यामुळे थेट त्यांनाही वॉर्ड क्रमांक, बेड क्रमांकासहित कॉल जातो, असे संशोधक विद्यार्थ्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
सलाईन संपल्यावर नर्सला शोधायची गरज नाही! आता आपोआप जाणार कॉल, विद्यार्थ्यांनी बनवलं अनोखं उपकरण
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement