advertisement

स्मार्ट TV खरेदी करताना चेक करा या 3 गोष्टी, अन्यथा होईल नुकसान

Last Updated:

नवा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचं प्लॅनिंग करणाऱ्यांसाठी आज आपण महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत. ज्याचा तुम्हाला खुप फायदा होऊ शकतो.

स्मार्ट टीव्ही
स्मार्ट टीव्ही
मुंबई : सध्याच्या काळात स्मार्ट टीव्ही हा प्रत्येकाच्या घरात आहे. पण तुमचा जुना टीव्ही खराब झाला असेल किंवा खुपच स्लो चालत असेल. तुम्ही नवा स्मार्ट फोन खरेदी करण्याची प्लॅनिंग करत असाल तर अजिबात घाई करू नका. आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत. ज्या नवा स्मार्ट टीव्ही खरेदी करताना तुम्हाला खुप कामी येतील. कारण टीव्हीमध्ये अनेक ऑप्शन्स आहेत. ज्यामध्ये OLED, QLED, LED पासून 4K, 8K पर्यंत ऑप्शन मिळतात. पण योग्य निवड करण्यासाठी फक्त ब्रांड किंवा किंमत पाहणे पुरेसे नसते.
सर्वात आधी तीन महत्त्वाच्या गोष्टी चेक करा. त्या म्हणजे स्क्रीन साइज, रेझोल्यूशन (पिक्चर क्वालिटी) आणि ऑपरेटिंग सिस्टम. हे तिन्ही फॅक्टर ठरवतात की, तुमचा टीव्ही घरात किती चांगला दिसेल आणि किती वर्षे चालेल. स्क्रीन साइज ही खोली आणि बसण्याच्या अंतराच्या हिशोबाने निवडा. लोक जी सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे, बाजारात मिळेल तो सर्वात मोठा टीव्ही विकत घेणे. मात्र, लहान खोलीत मोठा टीव्ही लावल्याने डोळ्यांवर ताण येऊ शकतो आणि चित्रही अनाकर्षक दिसू शकते.
advertisement
  • लहान खोली किंवा बेडरूम (10×12 फूट) साठी 32-43 इंचाचा टीव्ही बेस्ट आहे.
  • मीडियम लिव्हिंग रूम (12-15 फूट दूर बसणे) साठी 50-55 इंच चांगला राहतो.
  • मोठा हॉल किंवा फॅमिली रुमसाठी 65 इंच किंवा त्यापेक्षा जास्त.
नियम : बसण्याचे अंतर हे टीव्हीपासून जवळपास 1.5 ते 2.5 पट जास्त असावे. म्हणजेच 55 इंच टीव्हीसाठी 7-10 फूट अंतरावर बसा. तुमच्या घरातील अंतर कमी असेल तर लहान साइजचा टीव्ही खरेदी करा. अन्यथा डोळे थकतील. भारतात जास्तीत जास्त लोक हे 43-55 इंच टीव्ही निवडतात. कारण हे बजेट आणि स्पेस दोन्हीमध्ये फिट बसते.
advertisement
रेझोल्यूशन-पिक्चर क्वालिटीचं रहस्य
रेझोल्यूशन म्हणजे स्क्रीनवर किती पिक्सल आहे - जेवडे जास्त असतील, तेवढी शार्प आणि क्लियर इमेज. 32-43 इंचासाठी फूल HD (1080p) पुरेसे आहे. मात्र जास्तीत जास्त 4K येत आहे.
50 इंचाहून वरच्यासाठी 4K UHD (3840 x 2160) आवश्यक आहे. हे OTT प्लॅटफॉर्म्स(Netflix, Prime, Disney+) वर 4K कंटेंट दाखवते. कलर्स ब्राइट आणि डिटेल्स क्रिस्प लागतात. 8K सध्या महाग आणि कमी कंटेंट उपलब्ध आहे. यामुळे 4K ही स्मार्ट चॉइस आहे.
advertisement
HDR सपोर्ट (HDR10+, Dolby Vision) ही चेक करा - हे कलर्सला जास्त जीवंतपणा देते. तुम्ही मूव्हीज, स्पोर्ट्स किंवा गेमिंग जास्त पाहत असाल तर चांगला रेझोल्यूशनचा टीव्ही घ्या. अन्यथा जुना फील येईल.
ऑपरेटिंग सिस्टम- स्मार्ट फीचर्ससाठी बेस्ट
स्मार्ट टीव्हीचा खरा आनंद OS ने येतो. हे ठरवते की, अॅप्स किती सहज चालतील. स्पीड कशी राहील आणि अपडेट्स मिळतील की नाही.
advertisement
गूगलTV/अँड्रॉइड TV : सर्वात प्रसिद्ध, अनेक अॅप्स, Google Assistant, Chromecast बिल्ट-इन. सहज सर्च आणि यूझर-फ्रेंडली.
webOS (LG): खुप स्मूद, चांगली कस्टमायजेशन, थिनक्यू AI फीचर्स.
Tizen (Samsung): फास्ट, चांगली कंटेंट रिकमेंडेशन, सॅमसंगच्या डिव्हायसेसने चांगला कनेक्ट.
तुमच्या आवडत्या ॲप्सना (JioCinema, Hotstar, इत्यादी) तुमची ऑपरेटिंग सिस्टीम (OS) सपोर्ट करते आणि ती अपडेटेड आहे, याची खात्री करा. जुनी किंवा स्लो गतीची ऑपरेटिंग सिस्टीम असलेला टीव्ही सहजपणे क्रॅश होऊ शकतो.
advertisement
नवा स्मार्ट टीवही खरेदी करताना पहिले खोली मोजा. बसण्याचे अंतर मोजा आणि नंतर साइज, 4K रिझोल्यूशन आणि चांगला OS निवडा. यामुळे पैसे वाया जाणार नाही आणि घरात सिनेमा हॉलसारखा एक्सपीरियन्स मिळेल. तुमच्या बजेटनुसार, सॅमसंग, एलजी, सोनी, टीसीएल किंवा शाओमी यांसारख्या ब्रँड्सचा विचार करा. खरेदी करण्यापूर्वी रिव्ह्यू नक्की तपासा किंवा वाचा.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
स्मार्ट TV खरेदी करताना चेक करा या 3 गोष्टी, अन्यथा होईल नुकसान
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement