WhatsApp वर चुकूनही शेअर करु नका 4 गोष्टी! खावी लागेल जेलची हवा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
व्हॉट्सॲपने काही नियम केले आहेत. तुम्ही हे नियम मोडल्यास तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट बंद होऊ शकते आणि तुम्हाला कायदेशीर समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे व्हॉट्सॲपवर काही गोष्टी शेअर करू नका.
मुंबई : व्हॉट्सॲप हे सध्या जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. सुमारे 4 अब्ज लोक व्हॉट्सॲप वापरतात. WhatsApp मध्ये तुम्ही त्वरित मेसेज पाठवू शकता. व्हिडिओ कॉल करू शकता, फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकता आणि बरेच काही करू शकता. पण, व्हॉट्सॲपवर अशा काही गोष्टी आहेत, ज्या शेअर करणे तुम्हाला अडचणीत आणू शकते. व्हॉट्सॲपने काही नियम केले आहेत. तुम्ही हे नियम मोडल्यास तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट बंद होऊ शकते आणि तुम्हाला कायदेशीर समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे व्हॉट्सॲपवर काही गोष्टी शेअर करू नका. जाणून घ्या व्हॉट्सअॅपवर कोणत्या गोष्टी शेअर करु नयेत.
अश्लील कंटेंट कधीही शेअर करू नका
व्हॉट्सॲपवर कोणतेही चित्र किंवा व्हिडिओ कधीही शेअर करू नका जे अश्लील असतील. असे करणे बेकायदेशीर आहे आणि तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट बंद होऊ शकते.
देशविरोधी मजकूर टाळा
राष्ट्रविरोधी किंवा देशाची एकात्मता बिघडवणारी कोणतीही गोष्ट व्हॉट्सॲपवर कधीही शेअर करू नका. तुम्ही असे केल्यास तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट बंद होऊ शकते आणि तुम्हाला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
चाइल्ड पोर्नोग्राफी शेअर करू नका
लहान मुलांवर अत्याचार किंवा पोर्नोग्राफी यांसारख्या गोष्टी चुकूनही व्हॉट्सॲपवर शेअर करू नका. असे केल्याने तुरुंगात जावे लागू शकते आणि कोर्टातही जावे लागू शकते.
बदनामीच्या दाव्यांपासून सावध रहा
व्हॉट्सॲपवर कोणाचा फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना काळजी घ्या. तुम्ही एखाद्याचा फोटो किंवा व्हिडिओ शेअर केल्यास आणि त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला तर ते तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 07, 2024 11:55 AM IST









