Geyser Tips : हिवाळ्यात गिझर सुरू करण्यापूर्वी करा ही तयारी, अजिबात वाढणार नाही वीज बिल

Last Updated:

गिझरचा वापर योग्य पद्धतीने केला नाही, तर तो वीजबिलाचं ओझं वाढवू शकतो. त्यामुळे या हिवाळ्यात थंडीपासून बचाव करतानाच खिशावर ताण नकोय ना? मग जाणून घ्या काही सोप्या पण महत्त्वाच्या गीझर वापरण्याच्या टिप्स, ज्यामुळे तुम्ही गरम पाणीही मिळवाल आणि विजेची बचतही कराल.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : हिवाळा सुरू झाला की घराघरात गरम पाण्याची गरज भासू लागते. थंडीत सकाळी आंघोळ करायची असो किंवा स्वयंपाकघरातील काम, गार पाण्यात हात घालणं नकोसं होतं आणि अंगावर काटा येतो. अशावेळी गिझर हे एक सोयीचं आणि झटपट उपाय ठरतं. पण जर गिझरचा वापर योग्य पद्धतीने केला नाही, तर तो वीजबिलाचं ओझं वाढवू शकतो. त्यामुळे या हिवाळ्यात थंडीपासून बचाव करतानाच खिशावर ताण नकोय ना? मग जाणून घ्या काही सोप्या पण महत्त्वाच्या गीझर वापरण्याच्या टिप्स, ज्यामुळे तुम्ही गरम पाणीही मिळवाल आणि विजेची बचतही कराल.
नवीन गिझर घेण्याचा विचार करत असाल, तर त्याचं साइज आणि स्टार रेटिंग तपासणं खूप महत्त्वाचं आहे. अनेकदा लोक चुकीने खूप मोठा किंवा खूप लहान गिझर घेतात. छोटा गिझर घेतल्यास वारंवार ऑन करावा लागतो आणि मोठा गिझर घेतल्यास गरजेपेक्षा जास्त वीज खर्च होते. त्यामुळे जेवढी गरज आहे तेवढाच गिझर वापरा.
4 स्टार किंवा 5 स्टार रेटिंग असलेला गिझर नेहमीच जास्त ऊर्जा-कार्यक्षम ठरतो.
advertisement
लहान कुटुंबासाठी 15-20 लिटरचा गिझर पुरेसा आहे, तर मोठ्या कुटुंबासाठी 25-30 लिटर क्षमता योग्य ठरते.
वेळेचं भान ठेवा
हिवाळ्यात अनेकदा लोक गिझर ऑन करून विसरतात आणि तो बराच वेळ चालू ठेवतात. असं केल्याने वीज वाया जाते आणि बिल वाढतं.
पाणी गरम करण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटं आधी गिझर सुरू करा आणि वापर झाल्यावर लगेच बंद करा.
advertisement
असं केल्याने पाणीही गरम होईल आणि विजेची अनावश्यक वापर टळेल.
थंडी वाढली की अनेकजण गिझरचं टेंपरेचर पूर्ण हाय ठेवतात. पण त्यामुळे गिझरचं हीटिंग एलिमेंट जास्त काम करतं आणि वीज जास्त खर्च होते.
गिझरचं तापमान 40 ते 50 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान ठेवणं उत्तम. यामुळे पाणी पुरेसं गरम राहील आणि विजेची बचत होईल.
advertisement
जर गिझरच्या पाइप्स उघड्या जागेत बसवल्या असतील, तर त्या मधून उष्णता पटकन बाहेर निघते. त्यामुळे इन्सुलेटेड पाइप आणि टँक वापरा. यामुळे पाणी जास्त वेळ गरम राहील आणि वारंवार गिझर चालू करण्याची गरज पडणार नाही.
टँकची स्वच्छता नियमित करा
पाण्यातील कॅल्शियम आणि खनिज पदार्थ गिझरच्या टँकमध्ये साचतात. त्यामुळे हीटिंग कॉईलवर थर बसतो आणि पाणी गरम करण्यासाठी जास्त वीज लागते. दर 3 ते 6 महिन्यांनी गिझर साफ करा आणि नियमित सर्व्हिसिंग करून घ्या. यामुळे त्याचं आयुष्य आणि कार्यक्षमता दोन्ही वाढतात.
advertisement
सोलर किंवा इंस्टंट गिझरचा विचार करा
मोठ्या कुटुंबांसाठी सोलर वॉटर गिझर हा उत्तम पर्याय ठरतो. यामध्ये विजेचा वापर खूपच कमी होतो, त्यामुळे बिलही वाढत नाही.
तर, लहान कुटुंबांसाठी इंस्टंट गिझर फायदेशीर आहे कारण तो फक्त गरजेपुरतंच पाणी गरम करतो.
हिवाळ्यात गिझर हा आवश्यक उपकरणांपैकी एक असतो, पण थोडी काळजी आणि स्मार्ट वापर केल्यास तुम्ही वीज बचत आणि बिल नियंत्रण दोन्ही करू शकता. योग्य साइज, स्टार रेटिंग, वेळेचं भान आणि इन्सुलेशन या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर तुमचा हिवाळा होईल उबदार आणि बचतदार.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Geyser Tips : हिवाळ्यात गिझर सुरू करण्यापूर्वी करा ही तयारी, अजिबात वाढणार नाही वीज बिल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement