Ghibli इमेज क्रिएट करताना कधीच करु नका ही चूक!डेटा चोरीचा वाढेल धोका
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
पोलिसांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले आहे की, सर्वच एआय अॅप्स यूझर्सच्या गोपनीयतेचे रक्षण करत नाहीत. म्हणून, कोणत्याही अज्ञात एआय अॅपवर तुमचे पर्सनल फोटो अपलोड करण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.
मुंबई : आजकाल, एआय-जनरेटेड घिबली कार्टून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. जिथे लोक त्यांचे पर्सनल फोटो अपलोड करत आहेत आणि त्यांना एका अनोख्या अॅनिम लूकमध्ये रूपांतरित करत आहेत. तसंच, गोवा पोलिसांनी यूझर्सना या ट्रेंडबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. पोलिसांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले आहे की, सर्वच एआय अॅप्स यूझर्सच्या गोपनीयतेचे रक्षण करत नाहीत. म्हणून, कोणत्याही अज्ञात एआय अॅपवर तुमचे पर्सनल फोटो अपलोड करण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.
AI अॅप्समधून डेटा चोरीचा धोका
AI-आधारित इमेज जनरेशन अॅप्स अनेकदा यूझर्सचे फोटो आणि डेटा साठवतात, ज्याचा गैरवापर होऊ शकतो. अनेक फ्री एआय अॅप्स यूझर्सच्या संमतीशिवाय फोटोज सेव्ह करू शकतात. त्या थर्ड पार्टीला विकू शकतात किंवा डीपफेकसारख्या धोकादायक तंत्रज्ञानात त्यांचा वापर करू शकतात. अशा गोपनीयतेच्या चिंतेमुळे, गोवा पोलिसांनी लोकांना फक्त विश्वसनीय एआय अॅप्स वापरण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
जिबली कार्टून ट्रेंड काय आहे?
घिबली कार्टून ही एक अनोखी अॅनिमेशन शैली आहे. जी जपानी अॅनिमे दिग्गज हयाओ मियाझाकीने लोकप्रिय केली आहे. या शैलीत बनवलेले एआय-पोर्ट्रेट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. ओपनएआयने अलीकडेच चॅटजीपीटीचा जिबली-शैलीचा एआय इमेज जनरेटर लाँच केल्यानंतर या ट्रेंडला वेग आला आहे. लोक एआय वापरून त्यांचे सामान्य फोटो मजेदार कार्टूनमध्ये रूपांतरित करून शेअर करत आहेत. तसंच, यामुळे डेटा चोरी आणि गोपनीयतेचे उल्लंघन होण्याचा धोका देखील वाढतो.
advertisement
AI अॅप वापरण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे
1. फक्त विश्वसनीय आणि लोकप्रिय एआय अॅप्स वापरा.
2. तुमचा डेटा कसा वापरत आहेत हे पाहण्यासाठी अॅपची प्रायव्हसी पॉलिसी काळजीपूर्वक वाचा.
3. अज्ञात किंवा नवीन AI वेबसाइटवर तुमचे फोटो अपलोड करू नका.
advertisement
4. एखाद्या अॅपने तुमच्या फोटोंमध्ये अनावश्यक प्रवेश मागितला तर तो वापरू नका.
5. कोणत्याही सायबर फसवणूक किंवा संशयास्पद हालचालींची तक्रार सायबर सेलला तात्काळ करा.
सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता महत्त्वाची
एआय तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे, लोकांना त्यांच्या गोपनीयतेबद्दल आणि डिजिटल सुरक्षिततेबद्दल अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. एआय आधारित अॅप्स वापरताना, तुमचा डेटा सुरक्षित राहील आणि तुम्ही कोणत्याही बनावट किंवा संशयास्पद प्लॅटफॉर्मला बळी पडणार नाही याची खात्री करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 02, 2025 5:48 PM IST








