GPS फक्त लोकेशनपुरतं मर्यादित नाही, आता तुम्ही कोणासोबत आहात हे देखील कळणार, IIT दिल्लीचा धक्कादायक रिसर्च
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हाला माहित आहे का, हाच GPS आणि फोनमधील सेंसर तुमच्याबद्दल इतकी माहिती देतात की तुमचं गोपनीय आयुष्यही उघड होऊ शकतं?
मुंबई : आजकाल आपल्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. घरात असो, ऑफिसमध्ये असो किंवा प्रवासात फोन आपल्यापासून क्षणभरही दूर राहत नाही. आपण कुठे आहोत, किती वेळ चाललो, कोणत्या ठिकाणी थांबलो हे सर्व काही फोनमधील GPS आणि सेंसरच्या मदतीने सहज फोनमध्ये रेकॉर्ड होतं. पण तुम्हाला माहित आहे का, हाच GPS आणि फोनमधील सेंसर तुमच्याबद्दल इतकी माहिती देतात की तुमचं गोपनीय आयुष्यही उघड होऊ शकतं?
अशीच धक्कादायक बाब IIT दिल्लीच्या संशोधनात समोर आली आहे. संशोधकांनी 15 विद्यार्थ्यांच्या फोनवर जवळपास एक वर्ष रिसर्च केली. त्यांच्या फोनमध्ये एक टेस्टिंगसाठी खास कोड (मालवेअर) टाकण्यात आला होता. त्यातून दिसून आलं की, केवळ GPS सिग्नल आणि फोनच्या हालचालींवरून हे ओळखणं शक्य आहे की तुम्ही एकटे आहात की कोणासोबत, तुम्ही गर्दीच्या ठिकाणी आहात की रिकाम्या खोलीत, अगदी तुम्ही बस, ट्रेन किंवा विमानाने प्रवास करत आहात का हे देखील लक्षात येतं.
advertisement
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जरी GPS सिग्नल कमकुवत असले तरी त्यातील छोटे-छोटे पॅटर्न्स आणि फोनच्या सेंसरमधून मिळणारे डेटा पॉइंट्स एकत्र करून मशीन लर्निंग मॉडेल तुमच्या हालचालींचं अचूक विश्लेषण करू शकतात. म्हणजेच तुम्ही कोणत्या जागी आहात, कोणत्या वेळेला कुठे जाता, कोणासोबत वेळ घालवता याचा एक डिजिटल प्रोफाइल तयार होत जातो.
आता विचार करा, आपण दररोज वापरत असलेल्या अॅप्सना आपण किती सहजपणे लोकेशन परवानगी देतो. पण हेच अॅप्स फक्त तुमची लोकेशनच नाही, तर तुमचं वागणं, हालचालींचा पॅटर्न, सिग्नलची तीव्रता, टाइम स्टॅम्प इत्यादी माहिती गोळा करून तिचं विश्लेषण करतात.
advertisement
म्हणूनच आता सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे.
सर्वप्रथम, लोकेशन परमिशन तपासा आणि फक्त आवश्यक अॅप्सनाच ती द्या.
शक्य असल्यास “Allow only while using app” हा पर्याय निवडा, म्हणजे अॅप बॅकग्राउंडमध्ये तुमचं ट्रॅकिंग करू शकणार नाही.
तसेच फाइन लोकेशन (अचूक ठिकाण) ऐवजी कोर्स लोकेशन (अंदाजे ठिकाण) निवडा, त्यामुळे तुमचं नेमकं ठिकाण उघड होणार नाही आणि जर अॅपला सतत लोकेशन लागणार नसेल, तर बॅकग्राउंड लोकेशन बंद ठेवा.
advertisement
तंत्रज्ञान आपल्या जीवनाला सोपं करत असलं, तरी त्याचबरोबर आपल्या गोपनीयतेसाठी मोठं आव्हानही निर्माण करत आहे. त्यामुळे डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी सावधगिरी हाच सर्वोत्तम उपाय आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 02, 2025 6:03 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
GPS फक्त लोकेशनपुरतं मर्यादित नाही, आता तुम्ही कोणासोबत आहात हे देखील कळणार, IIT दिल्लीचा धक्कादायक रिसर्च










