advertisement

15000 रुपयांहून स्वस्त मिळतोय हा भारी iPhone, फ्लिपकार्टवर बंपर ऑफर 

Last Updated:

फ्लिपकार्टवर Apple iPhone 16 मोठ्या सूटवर उपलब्ध आहे. A18 Bionic प्रोसेसर, OLED डिस्प्ले आणि 48MP कॅमेराचा हा iPhone आता ₹64,900 मध्ये उपलब्ध आहे. जाणून घ्या बँक आणि एक्सचेंज ऑफरची पूर्ण डिटेल्स...

आयफोन डिस्काउंट
आयफोन डिस्काउंट
मुंबई : तुम्हीही दीर्घकाळापासुन अ‍ॅपल iPhone घेण्याचा विचार करत असाल तर आता प्रतीक्षा संपली आहे. सध्या फ्लिपकार्टवर iPhone 16 ची जबरदस्त डील हवी असेल, ज्यामध्ये हा प्रीमियम स्मार्टफोन ₹65,000 पेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. सोबतच बँक आणि एक्सचेंज ऑफर्सही जोडल्या आहेत, तेव्हा डीलही आणखी स्वस्त पडू शकते.
अ‍ॅपल iPhone 16 भारतात ₹79,900 च्या किमंतीत लॉन्च केला गेला होता. मात्र आता फ्लिपकार्टवर यावर थेट ₹15,000 चं डिस्काउंट दिलं जात आहे. ज्यानंतर याची किंमत कमी होऊन ₹64,900 होते. तुम्ही फ्लिपकार्ट SBI किंवा फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पैसे भरले तर तुम्हाला अ‍ॅडिशनल 5% कॅशबॅकही मिळेल. जे ₹4,000 पर्यंत असू शकतं. म्हणजेच योग्य ऑफर्ससह हा iPhone आणखी स्वस्त होतो.
advertisement
इतकेच नाही तर, फ्लिपकार्ट फक्त ₹5,409 प्रति महिना पासून सुरू होणारे नो-कॉस्ट EMI ऑप्शन देखील देत आहे. अशा प्रकारे, तुम्ही एकाच वेळी मोठी रक्कम खर्च न करता नवीन आयफोन खरेदी करू शकता.
जुन्या फोनने अपग्रेड करणाऱ्यांसाठी एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर तुम्ही तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात ₹53,500 पर्यंतचं एक्सचेंज बोनस मिळवू शकता. खरंतर एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या फोनची कंडीशन, ब्रँड आणि व्हेरिएंटवर अवलंबून असेल.
advertisement
आयफोन 16 ची फीचर्स काय आहेत?
स्पेसिफिकेशननुसार, आयफोन 16 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे, जो त्याच्या शानदार कलर आणि ब्राइटनेससाठी ओळखला जातो. जरी त्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे, तरी iOS ची स्मूथनेस प्रीमियम यूझर अनुभव सुनिश्चित करते. कामगिरीसाठी, फोनमध्ये Apple चा लेटेस्ट A18 बायोनिक प्रोसेसर आहे, जो 8GB रॅमसह जोडलेला आहे. 3,561mAh बॅटरी दैनंदिन वापरासाठी चांगली बॅटरी बॅकअप प्रदान करते.
advertisement
48-मेगापिक्सेल कॅमेरा
कॅमेरा विभागात, iPhone 16 मध्ये 48MPचा प्रायमरी कॅमेरा आणि मागील बाजूस 12MPचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MPचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. एकंदरीत, तुम्हाला प्रो मॉडेलवर जास्त खर्च करायचा नसेल आणि एक शक्तिशाली iOS अनुभव हवा असेल, तर iPhone 16 ची ही डील नक्कीच पाहण्यासारखी आहे.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
15000 रुपयांहून स्वस्त मिळतोय हा भारी iPhone, फ्लिपकार्टवर बंपर ऑफर 
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement