Jio यूझर्सना 18 महिन्यांसाठी फ्री मिळतंय Google AI Pro सब्सक्रिप्शन, असे करा अ‍ॅक्टिव्ह 

Last Updated:

Reliance Jioने आपल्या यूझर्ससाठी 18 महिन्यांसाठी फ्री Google AI Pro (Gemini Pro) सबस्क्रिप्शनची घोषणा केली आहे. याचा फायदा कोण घेऊ शकते आणि ते अ‍ॅक्टिव्हेट करण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या. तुमच्या नंबरवर ते कसे अ‍ॅक्टिव्ह करायचे ते स्टेप बाय स्टेप समजून घ्या.

जिओ गुगल एआय प्रो ऑफर
जिओ गुगल एआय प्रो ऑफर
मुंबई : भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Reliance Jioने आपल्या यूझर्ससाठी एक उत्तम ऑफर जाहीर केली आहे. कंपनी आता आपल्या ग्राहकांना 18 महिन्यांचे फ्री Google AI Pro सबस्क्रिप्शन (जेमिनी प्रो) देत आहे. ही ऑफर गुगल आणि जिओ यांच्यातील भागीदारीचा एक भाग आहे. ज्याचा उद्देश भारतीय यूझर्सना अडव्हान्स्ड AI टूल्सची फ्री प्रवेश प्रदान करणे आहे.
सुरुवातीला, Jioने सांगितले की, ही ऑफर 18 ते 25 वयोगटातील यूझर्ससाठी मर्यादित असेल. परंतु आता कंपनीने ती सर्व यूझर्ससाठी खुली केली आहे. याचा अर्थ असा की तुमचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त असले तरीही तुम्ही Free Google AI Pro Subscriptionचा लाभ घेऊ शकता.
advertisement
Free Google AI Pro Subscription कसे मिळवायचे?
  • तुमच्याकडे जिओचा 5G Unlimited Plan असेल, तर तुम्ही हे सबस्क्रिप्शन सहजपणे अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. फक्त खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.
  • तुमच्या फोनवर MyJio अ‍ॅप उघडा (किंवा डाउनलोड करा).
  • होम पेजवर, तुम्हाला वरच्या बाजूला ‘Early Access’ बॅनर दिसेल.
  • ‘Claim Now’ बटणावर टॅप करा.
  • तुमच्या ब्राउझरमध्ये एक नवीन पेज उघडेल.
  • येथे, तुम्हाला प्लॅन डिटेल्स दिसतील. खाली स्क्रोल करा आणि 'Agree' वर टॅप करा.
  • तुम्ही आता जेमिनी अ‍ॅपमध्ये तुमचे Pro Status कंफर्म करू शकता.
  • बस झाले! तुमचे 18 महिन्यांचे Google AI Pro Subscription आता अ‍ॅक्टिव्ह झालेय.
advertisement
Google AI Proचे फायदे काय आहेत?
Google AI Pro (Gemini Pro)तुम्हाला Free व्हर्जनच्या तुलने अनेक अडव्हान्स्ड फीचर देते.
  • Gemini 2.5 Pro मॉडलमध्ये अ‍ॅक्सेस
  • AI Image Generation आणि Deep Research टूल्स
  • Veo 3.1 Fast फीचने टेक्स्टने व्हिडिओ बनवणे
  • Gemini Code Assist आणि Command Line Interface
  • Gmail, Drive, Docs, Sheets सारख्या अ‍ॅप्समध्ये AI सहाय्य
  • Flow आणि NotebookLM प्लॅटफॉर्मवर हाय लिमिट्स
  • 2TB स्टोरेज (Drive, Gmailआणि Photosमध्ये)
  • या प्लॅनची ​​किंमत साधारणपणे दरमहा ₹1,950 असते, परंतु Jio यूझर ते संपूर्ण 18 महिन्यांसाठी फ्री वापरू शकतात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Jio यूझर्सना 18 महिन्यांसाठी फ्री मिळतंय Google AI Pro सब्सक्रिप्शन, असे करा अ‍ॅक्टिव्ह 
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement