google : तुम्हाला घरबसल्या गुगल देईल पैसेच पैसे, फक्त एवढंच काम करायचं!

Last Updated:

गुगल हे केवळ सर्च इंजिन नसून, या लोकप्रिय टूलचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारे कमाई करू शकता. या साठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
मुंबई, 30 नोव्हेंबर : कोणत्याही गोष्टीचा संदर्भ किंवा माहिती शोधायची असेल तर आपण इंटरनेटची मदत घेतो. इंटरनेट आणि गुगल हे एक पक्कं समीकरण बनलं आहे. युजर्सच्या गरजा ओळखून गुगलने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गुगलचा वापर करून तुम्ही आता कमाईदेखील करू शकता. गुगलच्या मदतीनं कमाई करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमचं कौशल्य आणि टार्गेटच्या आधारे यापैकी चांगले पर्याय निवडू शकता. गुगलच्या माध्यमातून कमाई नेमकी कशी करता येते.
गुगल हे केवळ सर्च इंजिन नसून, या लोकप्रिय टूलचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारे कमाई करू शकता. या साठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्हाला गुगलच्या मदतीनं कमाई करायची असेल तर सर्वप्रथम काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी वेळ, प्रयत्न आणि कष्ट आवश्यक असतात. गुगलच्या मदतीने उत्पन्न मिळवण्यासाठीसुद्धा कठोर परिश्रमांची गरज असते. यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं लागेल. कामात सातत्य ठेवावं लागेल.
advertisement
तुम्हाला या सर्च इंजिनचा वापर करून नेमकं कोणतं ध्येय गाठायचं हे निश्चित करावं लागेल. तुम्हाला पैसे कमावयचे आहेत की बिझनेस वाढवायचा आहे हे ठरवावं लागेल. लक्ष्य निश्चित केल्यावर तुम्हाला तुमची खासयित शोधावी लागेल. यात तुमची आवड कोणती, तुमच्याकडे कोणती कौशल्य आहेत हे पडताळावं लागेल. स्पेशॅलिटी शोधल्यावर तुम्ही गुगलचा वापर करून टार्गेट कसं पूर्ण करणार याचा प्लॅन तयार करावा लागेल.
advertisement
गुगलच्या माध्यमातून कमाईसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गुगल सर्व्हे हा त्यापैकीच एक पर्याय होय. हा एक सर्व्हे प्रोग्रॅम आहे, जो तुम्हाला प्रॉडक्ट किंवा सेवांबद्दल लोकांकडून फीडबॅक गोळा करण्यासाठी पैसे देतो. तुम्ही सर्वेक्षण पूर्ण केल्यावर तुम्हाला त्या बदल्यात पैसे मिळतात.
गुगल अ‍ॅफिलिएट हा एक मार्केटिंग प्रोग्रॅम आहे. या माध्यमातून तुम्हाला इतर कंपन्यांच्या उत्पादनांचा किंवा सेवांचा प्रचार करण्यासाठी पैसे मिळतात. तुमच्या कंपनीच्या उत्पादनांची यूआरएल असेल तर तुम्ही तुमच्या वेबसाइटवर किंवा सोशल मीडियावर त्याची जाहिरात करू शकता आणि जेव्हा कोणी ते प्रॉडक्ट विकत घेतं तेव्हा तुम्हाला कमिशन मिळू शकतं. गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म ही एक कम्प्युटिंग सर्व्हिस आहे. ही सुविधा तुम्हाला तुमच्या वेबसाइट्स, अ‍ॅप्स आणि इतर अ‍ॅप्लिकेशन्स चालवण्यासाठी कम्प्युटिंग, स्टोरेज आणि नेटवर्किंग सोल्यूशन्स पुरवते. तुम्ही गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म वापरून तुमच्या ग्राहकांकडून सेवा शुल्क किंवा सदस्यता शुल्क घेऊ शकता.
advertisement
गुगल प्ले स्टोअर हे एक डिजिटल स्टोअर आहे. या ठिकाणी अ‍ॅप्स, गेम, म्युझिक, चित्रपट किंवा डिजिटल कंटेंट विकला जातो. एखाद्या युजरनं तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस खरेदी केली तर तुम्हाला त्याचे पैसे मिळतात. गुगलचा अ‍ॅडसेन्स हा एक अ‍ॅडर्व्हटायझिंग प्रोग्रॅम आहे. जो तुम्हाला तुमच्या वेबसाइट किंवा ब्लॉगवर जाहिरात दाखवण्यासाठी पेमेंट देतो. जेव्हा एखादा युजर तुमच्या जाहिरातीवर क्लिक करून ती पाहतो, तेव्हा त्या बदल्यात तुम्हाला त्याचे पैसे मिळतात.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
google : तुम्हाला घरबसल्या गुगल देईल पैसेच पैसे, फक्त एवढंच काम करायचं!
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement