advertisement

Samsung Galaxy S24 ने अ‍ॅपल गूगलला दिलं टेन्शन, एका फोनमध्ये मिळेल दोन्हींची मजा

Last Updated:

Samsung Galaxy S24 ची यूझर्स दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत होते. फोन पुढील वर्षाच्या जानेवारीत लॉन्च केला जाऊ शकतो मात्र लीक रिपोर्टनुसार, हा फोन अ‍ॅपल आयफोन 15 आणि गूगल पिक्सल 8 च्या फीचर्ससह लॉन्च केला जाईल. यात आर्टिफिशियल इंटेलिजेन्स फीचरचा सपोर्टही दिला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी
सॅमसंग गॅलेक्सी
मुंबई : Samsung Galaxy S24 ची यूझर्स दीर्घकाळपासून वाट पाहताय. या फोनची लॉन्च डेटही जवळ येत आहे. अशा वेळीफोनशी संबंधीत डिटेल्स सतत लीक होताय. फोन तसं तर पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. मात्र लीक रिपोर्ट सॅमसंग गॅलेक्सी S24 स्मार्टफोन आतापर्यंतचा खास स्मार्टफोन असेल. जो अ‍ॅपल आयफोन 15 आणि गूगल पिक्सलच्या फीचर्ससह येईल. म्हणजेच एका फोनने दोन्ही स्मार्टफोन कंपन्यांना टार्गेट केलं जाईल.
काय असतील खास फीचर्स
Apple iPhone 15 सीरीजचे प्रो मॉडेल टायटॅनियम फ्रेमसह सादर करण्यात आले होते. तर Google Pixel 8 सीरीज Zen AI फीचर्ससह लॉन्च करण्यात आली होती. जी सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनमध्ये प्रदान केली जाईल. हे एक आर्टिफिशियल इंटेलिजेन्स फीचर असेल. जे सॅमसंग यूझर्सला रिअल-टाइम लाईव्ह कॉल फीचर्स ट्रान्सलेट करण्याचा ऑप्शन देईल. Apple आणि Google चे हे दोन्ही स्मार्टफोन फीचर्स Samsung Galaxy S24 स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणार आहेत. तसेच सॅमसंगच्या स्वतःच्या स्मार्ट पेन्सिलचाही सपोर्ट असेल. प्रोसेसर आणि कॅमेराच्या बाबतीत सुधारणा होईल. एकूणच, आगामी Samsung Galaxy S24 स्मार्टफोन हा एक पूर्ण पॅकेज फोन असेल, जो यूझर्सच्या सर्व गरजा पूर्ण करेल.
advertisement
संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S24 च्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट दिला जाऊ शकतो. Samsung Galaxy S24 Ultra स्मार्टफोन 6.8-इंचाच्या QHD+ डिस्प्लेसह येईल. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाईल. हा फोन 12GB रॅम सपोर्टसह दिला जाऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
Samsung Galaxy S24 ने अ‍ॅपल गूगलला दिलं टेन्शन, एका फोनमध्ये मिळेल दोन्हींची मजा
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement