advertisement

Smartphone चा वापर करणारे 10 मधून 6 लोक रोज करतात ही चूक! होतात गंभीर परिणाम

Last Updated:

एसा संशोधनानुसार 10 मधून 6 लाक आपला फोन बाथरुमध्ये घेऊन जातात. मात्र ही सवय तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकते.

स्मार्टफोन टिप्स
स्मार्टफोन टिप्स
नवी दिल्ली : काही काळापूर्वी एका संशोधनात माहिती समोर आली होती की, 10 मधून 6 लोक आपला स्मार्टफोन टॉयलेटमध्ये घेऊन जातात. या सवयीचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. ही स्टडी NordVPN द्वारे करण्यात आली होती. अभ्यासात सामिल 61.6 टक्के लोकांनी म्हटलं होतं की, ते त्यांचा मोबाईल बाथरुममध्ये फेसबूक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्क्रोल करण्यासाठी घेऊन जातात. तर 33.9 टक्के लोकांनी म्हटलं की, बाथरुममध्ये ते आपला स्मार्टफोन करंट अफेयर्सचे अपडेट्स घेण्यासाठी वापरतात. संशोधनात सामिल 24.5 टक्के पार्टिसिपेंट्स मानतात की, ते आपला फोन वॉशरुममध्ये मॅसेज किंवा कॉल करण्यासाठी यूज करतात.
याविषयावर याहू लाइफ यूकेसोबत बातचितमध्ये इंफेक्शन कंट्रोल स्पेशलिस्ट डॉ. ह्यू हेडन यांनी सांगितलं की, स्मार्टफोन टॉयलेट सीटच्या तुलनेत दहापट जास्त जंतूंना प्रोत्साहन देऊ शकतो. यासोबतच ते म्हणाले की, टचस्क्रीन, 'डिजिटल युगातील डास' आहे. कारण त्यामुळे संक्रमक रोग पसरू शकतात. डॉ. हेडन यांनी म्हटलं की, आपण शेयर्ड सरफेसला स्पर्श करतो. नंतर आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनचा उपयोग करतो. तर क्रॉस कंटामिनेशनचा धोका होतो. नंतर फोन संक्रमणाचा स्त्रोत होऊ शकतो.
advertisement
स्क्रीनवर 28 दिवस जिवंत राहतात जंतू
याहू लाइफ यूकेच्या रिपोर्टनुसार, स्मार्टफोनच्या स्क्रीनवर जंतू हे 28 दिवस जीवंत राहू शकतात. हे टचस्क्रीन फोनला जंतू आणि रोगजनकांसाठी संभावित प्रजनन स्थळात रुपांतर करु शकतात. रिपोर्टमध्ये यापूर्वीच्या काही रिसर्च पेपर्सचा हवाला देत सांगितलं होतं की, स्टॅफिलोकोकस मोबाईल फोनवर सर्वात जास्त आढळणाऱ्या पॅथोजन्समधून एक आहे. हे पॅथोजन तोंड, डोळे किंवा नाकाच्या संपर्काच्या माध्यमातून शरीरात आपला रस्ता शोधते. ज्यामुळे श्वसन आणि स्किन इंफेक्शनसारख्या अनेक समस्या होऊ शकतात. वॉशरुममध्ये स्मार्टफोनचा वापर केल्याने स्मार्टचे जंतू आणि पॅथोजनमुळे इंन्फेक्शन होण्याची शक्यता दुप्पट होते. यामुळे सल्ला दिला जातो की, बाथरुममध्ये मोबाईल फोन घेऊन जाणं टाळायला हवं.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
Smartphone चा वापर करणारे 10 मधून 6 लोक रोज करतात ही चूक! होतात गंभीर परिणाम
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement