advertisement

WhatsApp मध्ये ऑन करा ही सेटिंग, हॅकिंगपासून होईल बचाव; अनेकांना माहितीच नाही

Last Updated:

WhatsApp Hacking: स्कॅमर लोकांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करतात. तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक होऊ नये म्हणून तुम्हीही काही खबरदारी घ्यावी. ती कशी चला पाहूया...

व्हॉट्सअॅप सेटिंग
व्हॉट्सअॅप सेटिंग
WhatsApp Settings: व्हॉट्सअॅप हे एक अतिशय उपयुक्त ॲप आहे. जे जगभरातील लाखो लोक त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांशी चॅट करण्यासाठी, ऑडिओ-व्हिडिओ फाइल्स शेअर करण्यासाठी आणि ऑडिओ-व्हिडिओ कॉल करण्यासाठी वापरतात. हे सर्वात जास्त वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे असे म्हणता येईल. परंतु, हे ॲप देखील स्कॅमर्सपासून सुटलेले नाही. स्कॅमर लोकांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करतात. त्यामुळे तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक होऊ नये म्हणून तुम्हीही काही खबरदारी घ्यावी. तुम्ही हे कसे करू शकता चला पाहूया.
WhatsApp हॅकिंग
लोकांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. हे हॅकिंग टाळण्यासाठी व्हॉट्सॲपवर एक सेटिंग उपलब्ध आहे. याला टू-स्टेप व्हेरिफिकेशन म्हणतात. हे यूझर्सची सुरक्षा मजबूत करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पण, काही मोजक्याच लोकांना त्याबद्दल माहिती आहे. म्हणूनच बहुतेक लोक त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. तुम्हाला तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक होण्यापासून वाचवायचे असेल तर ते लगेच चालू करा.
advertisement
व्हॉट्सॲपवर ही सेटिंग लगेच चालू करा
1. सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर WhatsApp उघडा.
2. नंतर होम स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन व्हर्टिकल डॉट्सवर क्लिक करा.
3. यानंतर एक पॉप-अप मेनू उघडेल.
4. येथे तुम्ही Settings ऑप्शनवर क्लिक करा.
advertisement
5. त्यानंतर तुम्ही अकाउंट ऑप्शनवर टॅप करा.
6. यानंतर तुम्हाला Two-step verificationचा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा.
7. येथे तुम्ही तुमचा पिन सेट करा.
8. तुम्ही तुमचा ई-मेल अॅड्रेस देखील टाकू शकता.
9. यानंतर कोणीही तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट अॅक्सेस करू शकणार नाही.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsApp मध्ये ऑन करा ही सेटिंग, हॅकिंगपासून होईल बचाव; अनेकांना माहितीच नाही
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement