AC चालू असेल तर दारे-खिडक्या बंद करण्याची का असते गरज? चुकून उघडं राहिलं तर काय होईल परिणाम?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधीकधी नकळत लोक दरवाजा किंवा खिडकी उघडी ठेवून एसी सुरु करतात. अशावेळी काय आणि कोणत्या मुद्यांना सामोरं जावं लागू शकतं? असा प्रश्न लोकांच्या मनात उभा रहातो. चला याबद्दल माहिती घेऊ.
मुंबई : पावसाळा सुरु झाला आहे. पण असलं तरी देखील कडाक्याचं उन काही संपत नाही, ज्यामुळे लोकांना नकोसं होतं. अशावेळी पंखा, कुलर आणि एसी शिवाय लोक राहूच शकणार नाही. बहुतेक लोकांना एसीशिवाय राहणे शक्य नाही, पण एसी सुरु करताना आपण एक गोष्ट नक्कीच करतो, ते म्हणजे त्या खोलीतील दारं खिडक्या बंद करणे.
पण कधीकधी नकळत लोक दरवाजा किंवा खिडकी उघडी ठेवून एसी सुरु करतात. अशावेळी काय आणि कोणत्या मुद्यांना सामोरं जावं लागू शकतं? असा प्रश्न लोकांच्या मनात उभा रहातो. चला याबद्दल माहिती घेऊ.
एअर कंडिशनरची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि वीज बिल वाचवण्यासाठी आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगत आहोत. तुम्हाला पहिली गोष्ट करायची आहे की जर खोलीत खिडक्या आणि दरवाजे उघडे असतील तर ते लगेच बंद करा. कारण थंड हवा लवकर बाहेर जाईल आणि गरम हवा आत येईल. यामुळे तुमची खोली लवकर थंड होणार नाही. त्यामुळे विजेचा वापर वाढेल आणि वीज बिलही वाढेल.
advertisement
हे देखील लक्षात ठेवा
एसी चालवताना खोली सीलबंद राहील याची काळजी घ्यावी. असे केले नाही तर एसी नीट चालणार नाही आणि वीज बिलही खूप जास्त येईल. एसी चालवताना, लक्षात ठेवा की त्याचे कॉम्प्रेशन जास्त वाढू नये आणि ते सामान्यपणे कार्य करत रहावे.
खोली थंड झाल्यावर पंखा चालू करा
view commentsजर तुमची खोली थंड झाली असेल तर तुम्ही पंखा चालू करू शकता. यामुळे तुमची खोली जास्त काळ थंड राहते आणि तुमच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. एसी जास्त वेळ चालवल्याने मशीनवर खूप भार पडतो आणि एसी ब्लास्टिंगची शक्यता लक्षणीय वाढते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 19, 2024 3:27 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
AC चालू असेल तर दारे-खिडक्या बंद करण्याची का असते गरज? चुकून उघडं राहिलं तर काय होईल परिणाम?


