advertisement

सिम स्वॅपिंग म्हणजे काय? यामुळे कंपनी मालकाला 7.5 कोटींचा चुना

Last Updated:

मुंबईत सायबर ठगांनी सिम स्वॅपिंगच्या माध्यमातून एका खासगी कंपनीचे साडेसात कोटी रुपये चोरले. पोलिसांनी 4.65 कोटी रुपये फ्रिज केले, मात्र उर्वरित रक्कम काढण्यात फसवणूक करणाऱ्यांना यश आले.

सिम स्वॅपिंग
सिम स्वॅपिंग
मुंबई : मुंबईतील एका खासगी कंपनीची सायबर घोटाळेबाजांनी 7.5 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. कांदिवली येथे सोमवारी ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. फसवणूक करणाऱ्यांनी सिम स्वॅप करून कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये प्रवेश घेतला आणि अनेक अनधिकृत व्यवहार केले. काही मिनिटांतच सायबर गुन्हेगारांनी कंपनीच्या खात्यातून पैसे काढून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. पोलिस आपले काम करू शकतील तोपर्यंत गुन्हेगारांनी अकाउंटमधून मोठी रक्कम काढून खिशात टाकली होती.
पोलिसांनी 4.65 कोटी रुपये केले फ्रीज
या फसवणुकीची माहिती खासगी कंपनीला समजताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. या अनधिकृत व्यवहारांची माहिती देणारा मेलही त्यांनी पाठवला होता. माहिती मिळताच पोलिस कामाला लागले. सायबर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित बँकेला माहिती दिली आणि नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रारही दाखल केली. काही तासांतच 4.65 कोटी रुपये फ्रीज करण्यात तपास यंत्रणांना यश आले. उर्वरित रक्कम खात्यातून काढण्यात फसवणूक करणाऱ्यांना यश आले.
advertisement
सिम स्वॅपिंग म्हणजे काय?
सिम स्वॅपिंग हा ओळख चोरीचा एक प्रकार आहे. यामध्ये सायबर गुन्हेगार त्यांच्याकडे असलेले सिम तुमच्या मोबाईल क्रमांकाशी जोडतात. यासाठी सर्वप्रथम ते आपल्या पीडितेची सर्व माहिती गोळा करतात. यानंतर, ते तुमच्या मोबाइल सेवा प्रदात्याला कॉल करतील किंवा किरकोळ दुकानात जाऊन सिम कार्ड हरवल्याबद्दल किंवा खराब झाल्याबद्दल तक्रार करतील. यानंतर, तुमची सर्व माहिती देऊन, तो त्याच्याकडे असलेले सिम अॅक्टिव्ह करेल. असे झाले की, तुमच्याकडे येणारे सर्व फोन कॉल्स आणि एसएमएस सायबर गुन्हेगारांकडे जातील.
advertisement
अशी प्रकरणे कशी टाळायची?
- तुमचा फोन नंबर सतत इनअॅक्टिव्ह असेल किंवा रेंज असेल तर लगेच मोबाईल ऑपरेटरशी संपर्क साधा.
- तुमच्या बँकिंग व्यवहारांसाठी SMS आणि ईमेल अलर्ट अॅक्टिव्ह करा.
- कोणत्याही संशयास्पद लिंक, मेल आणि मेसेजवर क्लिक करू नका. कोणत्याही संशयास्पद ठिकाणी तुमची पर्सनल माहिती शेअर करू नका.
advertisement
- तुमच्या बँक अकाउंटवर लक्ष ठेवा आणि कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास बँकेला कळवा.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
सिम स्वॅपिंग म्हणजे काय? यामुळे कंपनी मालकाला 7.5 कोटींचा चुना
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement