advertisement

Alert! 'या' नंबरवरुन कॉल आल्यास उचलू नका, सरकारने दिला इशारा

Last Updated:

सरकारने फसव्या आंतरराष्ट्रीय कॉल्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे. यामध्ये काही नंबरचा समावेश आहे. हे नंबर कोणते आहे चला जाणून घेऊया.

स्कॅम कॉल
स्कॅम कॉल
मुंबई : सरकार वेळोवेळी लोकांना जागरूक करत असते आणि अशा घटना रोखण्यासाठी आपल्या स्तरावर कामही करते. काही दिवसांपूर्वी, सरकारने काही नंबर जारी केले होते आणि लोकांना अशा नंबरवरून येणाऱ्या कॉलला उत्तर देऊ नका असे सांगण्यात आले होते. हे काही आंतरराष्ट्रीय नंबर आहेत जे लोकांची फसवणूक करण्यासाठी कॉल करतात.
कोणत्या नंबरपासून राहावे सावधान?
सरकारच्या दूरसंचार विभागाने लोकांना आंतरराष्ट्रीय फसवणूक कॉलबद्दल सतर्क केले होते आणि त्यांना +77, +89, +85, +86, +84 इत्यादी फोन नंबरवरून येणाऱ्या कॉलला उत्तर देऊ नये असे सांगितले होते. विभागाने म्हटले आहे की, अशा नंबरवरून कोणाला कॉल येत असल्यास, sancharsaathi.gov.in वर त्याबद्दल माहिती द्या आणि असे नंबर ब्लॉक करण्यात आणि इतरांना वाचवण्यासाठी विभागाला मदत करा.
advertisement
सरकार लावतेय लगाम
देशातून बनावट कॉल करणाऱ्या लोकांवर सरकार सातत्याने कारवाई करत आहे. 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत सरकारने 6.69 लाख सिमकार्ड आणि 1,32,000 IMEI क्रमांक 'ब्लॉक' केले होते. सायबर गुन्ह्यांना सामोरे जाण्यासाठी सरकारच्या सर्वसमावेशक धोरणाचा भाग म्हणून असे प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत सायबर ठग आंतरराष्ट्रीय नंबरच्या मदतीने कॉल करून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत.
advertisement
सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा
देशात सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे टाळण्यासाठी, संशयास्पद फोन कॉल्स आणि मेसेजला प्रतिसाद देऊ नका. OTP इत्यादी संवेदनशील माहिती फोनवर कोणालाही देऊ नका. त्याचप्रमाणे फोनवर आलेली कोणतीही संशयास्पद लिंक किंवा ईमेल उघडू नका.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Alert! 'या' नंबरवरुन कॉल आल्यास उचलू नका, सरकारने दिला इशारा
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement