PalGhar : मॅरेथॉनमध्ये यश,पण धाप लागल्याने मैदानातच विद्यार्थिनी बेशुद्ध; पुढे जे घडलं त्याने सर्वजण हळहळले
Last Updated:
Palghar News : पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात शाळेच्या मॅरेथॉन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या एका दहावीच्या विद्यार्थिनीचा शर्यतीनंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ठाणे : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील तलासरी तालुक्यातील वेवजी येथील एका इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन शर्यतीनंतर अवघ्या काही वेळातच एका 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
त्या दिवशी नेमकं घडलं काय?
शनिवार,3 जानेवारी रोजी वेवजी सोरठपाडा येथील भारती अकादमीमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेअंतर्गत मॅरेथॉन शर्यत घेण्यात आली. या शर्यतीत दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यीनीने जिद्दीने सहभाग घेत तिसरा क्रमांक पटकावला. शर्यत पूर्ण केल्यानंतर काही वेळातच तिला धाप लागली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ती मैदानावर खाली बसली आणि काही क्षणांतच बेशुद्ध पडली.
advertisement
धावून मिळवला तिसरा क्रमांक, पण जीव वाचवता आला नाही
विद्यार्थींची आरोग्याची स्थिती पाहताच शाळा प्रशासनाने तिला तातडीने जवळच्या गुजरातमधील उंबरगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार विद्यार्थ्यीनीचा हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शाळेतील या घडलेल्या घटनेमुळे उंबरगाव आणि तलासरी तालुक्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 8:12 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
PalGhar : मॅरेथॉनमध्ये यश,पण धाप लागल्याने मैदानातच विद्यार्थिनी बेशुद्ध; पुढे जे घडलं त्याने सर्वजण हळहळले








