advertisement

Thane Power Cut : पाच तास उलटून गेले तरीही ठाण्यात लाईट नाही; कारण आलं समोर

Last Updated:

Thane Power Cut : ठाण्यात आज पहाटे अचानक वीज खंडित झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. उकाड्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली असून वीज कधी येणार याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत.

ठाण्यातील पहाटेपासून ल वीज पुरवठा ठप्प
ठाण्यातील पहाटेपासून ल वीज पुरवठा ठप्प
ठाणे : ठाणे शहरातील नागरिकांसाठी रविवारची सकाळी ही त्रासदायक ठरलेली आहे. कारण शहरात आज पहाटे पासून अचानक वीज पुरवठा खंडित झालेला आहे.रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेक नागरिक आरामात उठण्याच्या तयारीत होते, मात्र अचानक वीज गेल्याने त्यांच्या दिवसाची सुरुवातच त्रासदायक ठरली झाली.
ठाण्यात उकाड्याने नागरिक बेहाल
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साधारण 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान अचानक लाईट गेली. त्यात वीज नसल्याने पंथे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद पडली,यामुळे उकाड्यामुळे नागरिक जाम हैराण झाले. विशेषतहा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि घरातील महिलांना या परिस्थितीचा अधिक त्रास झाला.
नेमके कारण काय?
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास 22 केव्ही पडघा-वाडा आणि 220 केव्ही कोलशेत-खारबाव या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला होता, त्यामुशे त्या ट्रिप झाल्याने  घोडबंदर परिसरातील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Power Cut : पाच तास उलटून गेले तरीही ठाण्यात लाईट नाही; कारण आलं समोर
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement