advertisement

Kalwa News : 50 रुपयांच्या फाटक्या नोटेवरून अमानुष कृत्य, कळव्यात दूध विक्रेत्यासोबत विपरीत घडलं

Last Updated:

Kalwa Crime : कलवा शहरातून एका दुध विक्रेत्यासोबत क्षुल्लक गोष्टीवरुन भयानक प्रकार घडलेला आहे. जिथे नेमकं काय घडलं याबाबत जाणून घ्या.

News18
News18
ठाणे : क्षुल्लक गोष्टींवरुन सुरु झालेला वाद अनेकदा टोकाची भूमिका घेतो हे वारंवार महाराष्ट्र भरात सुरु असलेल्या घटनांतून समोर येत असते, अशातच ठाणे शहरातील कळवामध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथे फाटक्या 50 रुपयांच्या नोटेवरून सुरू झालेला वाद टोकाला पोहचल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार,कळव्यातील मातेश्वरी डेअरी परिसरात गंगाराम डांगी (वय 28) हे दूध विक्रीचे दुकान चालवतात. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी साधारण सुमारे सव्वाबाराच्या सुमारास मन्या नावाचा तरुण आपल्या दोन मित्रांसह त्यांच्या दुकानात आला. खरेदीदरम्यान त्याने दिलेली 50 रुपयांची नोट फाटलेली असल्याने गंगाराम यांनी ती बदलून देण्यास नकार दिला.यावरून दोघांमध्ये वाद सुरु झाला.
advertisement
वाद वाढत गेल्याने मन्या आणि त्याच्या मित्रांनी गंगाराम यांना दमदाटी केली, शिवीगाळ केली आणि दुकानातील काही मालाची तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मन्या, अमोल आणि आणखी एका साथीदाराने पुन्हा गंगाराम यांना गाठले आणि त्यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
या घटनेनंतर गंगाराम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. फाटक्या नोटेच्या किरकोळ कारणावरून झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Kalwa News : 50 रुपयांच्या फाटक्या नोटेवरून अमानुष कृत्य, कळव्यात दूध विक्रेत्यासोबत विपरीत घडलं
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement