एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा धमाका, केला आजपर्यंत सगळ्यात गंभीर आरोप

Last Updated:

ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी

News18
News18
ठाणे : शिवतीर्थावरील सभा गाजवल्यानंतर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा ठाण्यात पार पडली. यावेळी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी भाजप, अदानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केला. पण, यावेळी महाराष्ट्रावर जर संकट आलं तर राज ठाकरे, दोस्ती बिस्ती काही पाहणार नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घोडबंदर रोडवर असलेल्या जंगल एका बिल्डराला देण्याचा घाट घातला आहे, असा गंभीर आरोप केला आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर झालेल्या सभेचा दाखला देत पुन्हा एकदा अदानी आणि भाजपवर निशाणा साधला.
"घोडबंदर रोडच्या पुढे जंगल आहे, एक हजार एकर जागा, बिल्डराला देत आहे. गणेश नाईक यांनी सांगितलं हे होऊ देणार नाही. आनंदाची गोष्ट आहे. मला हे कळलं, एकनाथ शिंदे यांच्या ओळखीतील लोकाला करून द्यायचं आहे. वरून केंद्रातून हे सांगणार या उद्योगपतीला देऊन टाका. ताडोबाचं जंगलाचं असंच झालंय, एका उद्योगपतीला खाणीसाठी जमीन दिली आहे. ताडोबाची जमीन खानीला दिली आहे. एकडची जमीन देऊन टाकली. विमानतळ देऊन टाकलं, डम्पिंग ग्राऊंड आहे, ते देऊन टाकलं आहे. एकाच व्यक्तीवर एवढी मेहरबानी चालू आहे' असं म्हणत राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केला.
advertisement
5, 10 आणि १५ कोटी ऑफर देणार उमेदवार आणले स्टेजवर
"कल्याण डोंबिवलीतील लोक आणायची होती. आज एका एका घरात ५ हजार वाटत आहे. मला कळत नाही, विकास केला आहे मग पैसे का वाटत आहे. मला पैसे घेणाऱ्यांची चिंता वाटत आहे. आपण ५ ५ हजार आपल्या मुला मुलींना काय सांगत आहे. उद्या समाजात जातील काय सांगितली माझा बाप आणि आई मतासााठी विकले गेले. उद्या त्यांचे मित्र परिवार काय म्हणतील. उद्या ते म्हणतील यांचे आई वडील पैसे घेतात. कल्याण डोंबिवलीमध्ये गुलामांचा बाजार केला, पैसे देऊन उमेदवारी मागे घेण्यास मागे भाग पाडलं.
advertisement
एबी फॉर्म गिळता काय, सोलापूरमध्ये आमच्या माणसाचा खून घेतला इत पर्यंत सरकार चाललं आहे. पोलीस हताश आहे, कोर्टाकडे बघायला नको, हे कोणतं राज्य आहे. मला ती कल्याण डोंबिवलीतील माणसं आणायची आहे. मी फक्त दोन तीन नाव घेतो. शैलेश धात्रत, मनिषा धात्रत, पुजा धात्रत,  प्रभागात ४ जण उभे होते. किती पैसे घेतले असेल, तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. या तीन लोकांना एका घरात १५ कोटींची ऑफर दिली होती. मला त्यांना इकडे बोलायचं आहे. त्यांनी पैसे नाकारून निवडणुकीला उभे राहिले आहे. १५ कोटींची ऑफर नाकारणारे कुठे, ५ -५ हजारांमध्ये मत विकणारी कुठे?  दुसरं नाव आहे तेजश्री नाईक, यांना किती ऑफर दिली ५ कोटी रुपयांची ऑफर दिली. ५ कोटींची ऑफर नाकारणारे तेजश्री नाईक आहे, हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त आहे.
advertisement
उमेदवाराने एक कोटींची ऑफर नाकारली हा मराठी स्वाभिमान
"सुशील आवटे यांना १ कोटी रुपयांची ऑफर दिली होती, ती ऑफर नाकारली, अजून बरेच जण आहे. कुठून येतोय हा पैसा, काय चाललं आहे. किती पैसे वाटायचं आहे. महाराष्ट्रभर पैसे वाटले आहे. टाकसाळ आहे. कुणाला ५ कोटी, कुणाला १० कोटी, कुणाला १ कोटी बघायचं नाही. ही कोणती निवडणूक आहे, अशी निवडणूक नाही पाहिली. काही लगामच नाही, या लोकांना. बिनधास्त काही करायचं, कोर्टात जाऊन, पोलिसांमध्ये जाऊन उपयोग नाही. आमची मर्जी सुरू आहे.
advertisement
देवेंद्र फडणवीस साफ खोट बोलताय
बदलापूरमध्ये अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर केला आहे, या नराधमांना ठार मारलं पाहिजे, पण काही गुपीत बाहेर येणार होतं का, पण सहआरोपी तुषार आपटे होता, त्याला स्विकृत उमेदवारी भाजपने दिली. अविनाश जाधव यांनी धमकी दिली, मोर्चा काढणार आहे. त्यानंतर त्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला.  कोण आहात तुम्ही ५ हजार तुमच्या तोंडावर फेकून मारले जातील. इतकी हिंमत कुठून येते. छगन भुजबळ यांना जेलमध्ये टाकणारे देवेंद्र फडणवीस होते. जेव्हा आले तेव्हा मला चांगले वाटले होते. पण आता काय झालं माहित नाही. काल तो अण्णा मलाई आला होता, मुंबईचा आणि मराठी माणसाचा काही संबंध नाही आणि फडणवीस काय म्हणताय, त्याचा असा अर्थच नाही. मला असं कळत इंग्रजी त्यांना कळत असेल. खोट बोलत राहायचं, खोटं बोलत राहायचं आणि खोट्याचं खरं करायचं.
advertisement
मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही, असं तो  अण्णा मलाई म्हणताय, अन् फडणवीस म्हणताय, मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. तो असा बोललाच नाही, असं फडणवीस सांगत आहे. कुणासाठी करत आहे, कशासाठी करत आहात. हे फक्त हातावर बसणारे ससाणे आहे, ससाणा हा पक्षी मारून आणतो. आमचीच माणसं आमची वाट लावत आहे.
होय माझ्या घरी अदानी आले होते, मग...
"माझ्या घरी अदानी येऊन गेले, माझ्या घरी इतर उमेदवार येऊन गेले, माझ्याकडे आनंद महिंद्रा सुद्धा येऊन गेले, अनेक कलाकार येऊन गेले. मग मी काय त्यांची पापं झाकायची का, काल जे तुम्हाला दाखवलं हे भयानक आहे, भीषण आहे. दोन तीन वर्षांचा फोटो दाखवला आहे. आाता घरी आले आहे तर हाकलून देऊ का, ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर संकट येईल राज ठाकरे दोस्ती बिस्ती काही बघणार नाही. अडानींशी दोस्ती करण्याचा विषयच येत नाही, मी इतका अडानी नाही. मी जे दाखवलं ते भीषण आहे.
advertisement
अदानींवर इतकी मेहरबानी कशाला? 
हा माणूस सिमेंट मध्ये नव्हता आज देशात सिमेंटमध्ये दुसरा माणूस आहे. देशात दोन नंबरचा सिमेंट विकणारा माणूस आहे. आज इथं गुजराती माणसं इथं आली आहे, आमचं तुमचं काही भांडण नाही, आता आमच्याशी भांडायला येऊ नका, पण ही लोक मुद्दामहून करत आहे. अडानींना देशातील ८ ते १० विमानतळं दिली आहे.  नवी मुंबईतील एकच विमानतळ बांधलं आहे, बाकीची सगळी विमानतळं हे गन पॉईंटवर हस्तगत केली आहे. दुसरे चालवत असलेली विमानतळं अदानी यांनी ताब्यात घेतली आहे. पोर्ट गुजरात मधलं मुनरा पोर्ट आहे, पण देशभरातील इतर पोर्ट हे गन पॉईंटवर अदानींनी ताब्यात घेतली आहे. फक्त केंद्राचा दबाव आणि नरेंद्र मोदींचं नाव एका गोष्टीवर हा व्यक्ती देशभर पसरत गेला आहे. उद्या ही पोर्ट बंद झाली तर तुमचा व्यापार ठप्प, वीज बंद केली, तुमची लाईट बंद, मग तक्रार कुठे करायची.
नवी मुंबईला विमानतळ नेणार आणि मुंबई विमानतळाचा प्लॉट विकायला काढणार?
महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे. हा देशही काही विसरला नसेल, इंडिगोची विमानं बंद होती, इंडिगोच्या माणसांनी ६५ टक्के हवाई वाहतूक दिली आहे. त्यांनी आंदोलन केलं, विमानं बंद केली. अख्खा देश ठप्प झाला होता. विमानतळावर लोक अडकून पडली होती. देश अख्खा ठप्प, एक विमान कंपनी तुमचा देश बंद करू शकते. आज अदानींच्या हातात, सिमेंट आहे, विमानं आहे, पोर्ट आहे, उद्या जर सिमेंटचे भाव वाढवले तर घराच्या किंमती वाढतील. एक माणूस हे सगळं ठरवतोय, २०१४ ते २०१५ मध्ये एकच माणूस श्रीमंत झाला आहे, तो अंदानी आहे. टाटा , बिर्ला यांना ४० -५० वर्ष लागली आहे. इथंच एक विमानतळ होणार आहे. सांताक्रुझमध्ये विमानतळ हळूहळू बाहेर काढणार, नवी मुंबईला नेणार आणि मुंबई विमानतळाचा प्लॉट विकायला काढणार?
'मुंबई तुमची नाही ही ओळख पुसून टाकायची'
मी उद्योगपतीच्या विरोधात मी नाही, पण एकाच उद्योगपतीवर इतकी मेहरबानी का, हे विचारणारा माणूस मी आहे. बाकीचे उद्योगपती मेले आहे का, आणि मग या माणसाला सतत पुढे करायचं आहे. सगळं सुरू आहे. वाढवणच्या पुढे गुजरात लागत आहे. ही आपली शहर, ही आपली मराठी शहरं, याच्यावर मराठी ठसा पुसायचा आहे. नवरात्रीला गरबा खेळला जात असतो, आपलीही लोक जातात, महिलाही जातात, चांगली गोष्ट तो आानंदाचा ,सणाचा विषय आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, मुंबई विमानतळ जेव्हा अदानीने ताब्यात घेतलं त्यावेळी विमानतळावर गरबा खेळवण्यात आला. मुंबई तुमची नाही ही ओळख पुसून टाकायची आहे. गणपती काय ढोल लेझिम नाही का, विमानतळावर ढोल लेझिमच वाजलं पाहिजे, आपण इथं सगळे राहतो, इथं आला गुण्यागोविंदाने राहा, आमच्या घरी यायचं कपाट दुरस्ती करणे चालू आहे आणि बायकोकडे नजर टाकायची हे खपवून घेणार नाही.
ही सगळी शहर गुजरातला मिळवायची आहे. ही शहरं भौगोलिक दृष्या जमणार नाही, म्हणून हे सगळं सुरू आहे. ही निवडणूक कशासाठी सुरू आहे, ते सगळं त्यासाठी सुरू आहे. उद्या ठाण्याचे सगळे प्रश्न हे गुजरात सरकार सोडवत आहे. अनेक लोक मला म्हणता, मी घाबरवत नाही, मला उंबरठ्यावर संकट आहे ते कळत आहे, कोणत्याही क्षणी तुमच्यावर संकट येऊन ठेपेल. केंद्र, सरकार हातात आहे, उद्या पालिका हातात गेल्यावर कुणाला काही बोलण्याची वेळ राहणार नाही. त्यामुळे आजही ती वेळ आहे. हे ठाणं आपलं आहे. राज्यात बाहेरची माणसं भरवली जाणार आहे.
'तिथेच ठोकायचे, तिथेच मारायचे'
या आताच्या १५ तारखेला शिवसेनेची मशाल आणि मनसेचं इंजिन धावलं पाहिजे, आम्हाला सत्येचा हव्यास नाहीये, डोळ्यादेखत ही शहरं घेऊ नये. १५ तारखेला सतर्क राहा, सकाळी ६ वाजता बुथवर जा आणि जे काल सांगितलं तर दुबार मतदार करण्यासाठी आले तर तिथेच कानफटवायचे, तिथेच ठोकायचे आहे. तिथेच मारायचे आहे. ही शहरं वाचवा,
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा धमाका, केला आजपर्यंत सगळ्यात गंभीर आरोप
Next Article
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement