advertisement

Thane : ठाण्यात मेट्रो मार्गिकेतील अडथळा दूर; पण प्रशासनाचा हा निर्णय चर्चेत, नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

Thane News : ठाणे शहरातील मेट्रोचे नाव घेताच सध्या एक मुद्दा त्यासोबत चर्चेत येत आहे. नक्की हा मुद्दा कोणता आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

News18
News18
ठाणे : ठाणे शहरात अनेक मेट्रोचे प्रकल्प सध्या प्रगती पथावर सुरु आहेत तर अनेक मार्गिका सुरु झालेल्या आहेत. मात्र हे सर्व मेट्रो काम विना अडथळा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा नेमका निर्णय कोणता होता आणि यामुळे नेमका कोणता अडथळा दूर झाला त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
'हा' निर्णय चर्चेत
ठाणे शहरात सुरू असलेल्या विविध पायाभूत प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्यात मेट्रो 4 आणि 5, बोरिवली-ठाणे भुयारी मार्ग तसेच साकेत-माजिवडा उन्नत मार्ग अशा अनेक प्रकल्पांनंतर आता ठाण्यात प्रस्तावित अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो मार्गिकेसाठी तब्बल 3 हजारांहून अधिक झाडांवर परिणाम होणार आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार या प्रकल्पामुळे एकूण 3,212 झाडांवर परिणाम होईल. पण त्यापैकी 519 झाडे पूर्णपणे तोडण्यात येणार असून राहिलेले 2,693 झाडांचे पुनर्रोपण केले जाईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र पर्यावरणप्रेमी आणि कार्यकर्त्यांच्या मते पुनर्रोपण केलेली झाडे बहुतेक वेळा टिकत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हिरवाई कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
सततच्या कामांमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम
ठाणे शहरात गेल्या काही वर्षांत वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि सुरू असलेली विविध विकासकामे यामुळे रस्त्यांवर ताण वाढला आहे. मेट्रो, भुयारी मार्ग, उन्नत मार्ग, रस्त्यांचे रुंदीकरण आणि जलवाहिनी टाकण्याच्या कामांमुळे अनेक ठिकाणी सतत खोदकाम सुरू असते. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम होत आहे.
advertisement
वर्तुळाकार मेट्रोचा प्रस्ताव
ही समस्या सोडवण्यासाठी ठाण्यात अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो मार्गिका उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा आराखडा महा मेट्रो यांच्या मदतीने तयार करण्यात आला असून या प्रकल्पासाठी सुमारे 12 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे. दरम्यान या प्रकल्पामुळे हजारो झाडांवर होणाऱ्या परिणामामुळे पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane : ठाण्यात मेट्रो मार्गिकेतील अडथळा दूर; पण प्रशासनाचा हा निर्णय चर्चेत, नेमकं प्रकरण काय?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement