advertisement

Shocking News : तोंडावरचा ताबा सुटला आणि अनर्थ घडला; ठाण्यातील घटनेने सर्वजण हादरले

Last Updated:

Thane Crime News : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात अपशब्दांच्या रागातून चाकूहल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोन तरुण जखमी झाले असून श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News18
News18
ठाणे : ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरात अपशब्द वापरल्याच्या वादातून चाकूहल्ल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल सोनार उर्फ नेपाळी आणि त्याचा मित्र प्रथमेश उंबासे यांच्यावर अंकुश भोपळे उर्फ अंक्या याने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
किरकोळ वादातून चाकूने सपासप वार
मिळालेल्या माहितीनुसार,ही घटना 18 जानेवारी रोजी रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट येथील सीपी तलावाजवळ बिसलरी कंपनीजवळ असलेल्या पुलावर घडली. राहुल सोनार हा आपल्या मित्रासोबत तेथे उभा असताना अचानक अंकुश भोपळे तेथे आला. यावेळी त्याने 'उस दिन तू मुझे क्या बोला?' असे म्हणत राहुलला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
advertisement
मित्राला वाचवायला गेला अन् स्वतःही जखमी झाला
शिवीगाळाचा जाब विचारताच अंकुश अधिक चिडला. रागाच्या भरात त्याने जवळ असलेला चाकू काढून राहुल सोनारवर हल्ला केला. या हल्ल्यात राहुल जखमी झाला. दरम्यान राहुलचा मित्र प्रथमेश उंबासे याने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र अंकुशने त्यालाही धक्का देत मारहाण केली.
घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच श्रीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरोधात हल्ला आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking News : तोंडावरचा ताबा सुटला आणि अनर्थ घडला; ठाण्यातील घटनेने सर्वजण हादरले
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement