अमरावती : पुरणपोळी म्हटलं की, सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं! लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पुरणाची पोळी खायला आवडते. प्रत्येक महाराष्ट्रीय घरात हा पदार्थ बनतोच बनतो. होळीच्या मुहुर्तावर या पदार्थाला बहुतांश घरात बनवलं जातं, पण असं असलं तरी देखील इतर सणांना ही आवडीने पूरणपोळी बनवली जाते आणि खाल्ली ही जाते. गरम गरम तुपासोबत पूरण पोळी खाण्याची मजात वेगळी आहे. पण, काही जणांना चनाडाळीची पुरणपोळी आवडत नाही. अशांसाठी एक भन्नाट पर्याय आहे – शेंगदाणा पुरणपोळी. ही पुरणपोळी चवीला तर जबरदस्त लागतेच, पण बनवायलाही खूप सोपी आहे. चला, जाणून घेऊया शेंगदाणा पुरणपोळी कशी बनवतात.