मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या बीडमधील (Beed) सभेची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. बीडमधल्या नारायण गडावर तब्बल 900 एकर जागेवर मराठा समाज एकवटणार आहे. यासाठी शुक्रवारी मनोज जरांगे बैठक घेऊन आपली भूमिका आणि सभेची तारीख जाहीर करणार आहेत. ही सभा जगातली सर्वात मोठी सभा असेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
Last Updated: April 04, 2024, 22:33 IST