पुणे : आईस्क्रीम म्हंटल की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण आईस्क्रीम आवडीने खातात. यामध्ये ही अनेक प्रकारचे फ्लेवर उपलब्ध आहेत. हे बनवताना काही अंशी प्रमाणात केमिकलचा देखील वापर केला जातो. यामुळे बऱ्याच वेळा शरीराला त्रास देखील होतो. यामुळे पुण्यातील शिवाजीनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शुद्ध देशी गाईच्या दुधापासून केमिकल मुक्त इन्स्टंट आईस्क्रीम तयार केले आहे. यामध्ये एकूण 12 फ्लेवरच आईस्क्रीम बनवलं जात. ते बनवण्याची नेमकी पद्धत काय आहे याबद्दलच विद्यापीठातील तांत्रिक देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख धीरज कणखरे यांनी माहिती दिली आहे.



