मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेवेळी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या मुद्द्यामुळे मनसेची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी असल्याचे दिसते. हीच नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. महत्त्वाचे म्हणजे या भेटीनंतरही प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.



