चंद्रपुर जिल्ह्यात वर्धा नदीजवळील बामुर्डा घाट परिसरात दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. रेती उत्खननाच्या वादातून ही हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेमध्ये भारत नाकपाल या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.