महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक पार पडत आहेत.या निवडणुकीत पवार कुटुंबातून दोन उमेदवार निवडणुकीला उभे आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांचे नातू आणि अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार राज्यसभा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सादर केलेल्या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची मालमत्ता अधिक असल्याचे समोर आलं आहे.



