शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. तर, दुसरीकडे भाजप-शिवसेना शिंदे गटानेही आक्रमक प्रचाराला सुरुवात केली आहे. या महापालिका निवडणुकीत शिवसेना कोणाची यावर मुंबईकरांचा कौल दिसून येणार आहे. ठाकरे बंधूंची युती आणि शिवसेना शिंदे गट हे ८७ जागांवर एकमेकांविरोधात लढणार आहेत. यातील बहुसंख्य जागा या मराठीबहुल भागातील आहेत. त्यात ६९ मतदारात ठाकरे-शिंदे एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेत ठाकरेंची अग्निपरीक्षा असणार आहे.
Last Updated: Jan 05, 2026, 20:13 IST


