पुणे : मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनेक संस्था आणि व्यक्ती विविध स्तरांवर कार्यरत आहेत. मात्र, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून मराठी भाषा देश-विदेशात पोहोचवण्याचे काम पुण्यातील जैन समाजाच्या भावना संचेती गेल्या चार ते पाच वर्षांपासून सातत्याने करत आहेत. ‘म मराठी’ या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत 400 हून अधिक अमराठी नागरिकांना मराठी भाषा शिकवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.



