राज्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर सध्या पक्ष सोडणं,बदलणं आणि इतर घडामोडी राजकारणात पाहायला मिळत आहेत.मिरजेत 16 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला. तेव्हा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पक्ष सोडणाऱ्यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, "पक्ष बदलणाऱ्यांच्या प्रभागात ताकदीनं निवडणूक लढू. पक्ष बदलणारे,गद्दारी करणारे या सगळ्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थ आहे."
Last Updated: Dec 26, 2025, 15:39 IST


