शाळेतून घरी निघाल्या, वाटेत अघटित घडलं, टेम्पोच्या धडकेत दोन जिवलग मैत्रिणींचा मृत्यू

Last Updated:

अकरावीत शिकणारी प्रज्ञा धनाजी कोकाटे आणि तिची मैत्रीण बारावीत शिकणारी स्नेहल काशिनाथ वाघमोडे अशा अपघातात मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत.

मैत्रिणींचा अपघाती मृत्यू
मैत्रिणींचा अपघाती मृत्यू
प्रीतम पंडित, सोलापूर (मोहोळ): मोहोळ तालुक्यात टेम्पोने धडक दिल्यामुळे दोन जिवलग मैत्रिणींना जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. मोहोळ तालुक्यातील नजिक पिंपरी गावाजवळील ही अपघाताची घटना घडली.
अकरावीत शिकणारी प्रज्ञा धनाजी कोकाटे आणि तिची मैत्रीण बारावीत शिकणारी स्नेहल काशिनाथ वाघमोडे अशा अपघातात मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. प्रज्ञा ही स्कुटीवरून स्नेहलला घेऊन मोहोळवरून कुरुल गावाला जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली.
प्रज्ञा ही स्कुटीवरून स्नेहलला घेऊन मोहोळवरून कुरुल गावाला जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या धडकेत प्रज्ञा जागीच ठार झाली तर स्नेहल ही गंभीर जखमी झाल्यामुळे तिला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
advertisement
प्रज्ञा ही अकरावीत नेताजी महाविद्यालयात शिकत होती तर स्नेहल ही राष्ट्रमाता इंदिरा कन्या महाविद्यालयात शिकत होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शाळेतून घरी निघाल्या, वाटेत अघटित घडलं, टेम्पोच्या धडकेत दोन जिवलग मैत्रिणींचा मृत्यू
Next Article
advertisement
Thackeray Alliance NCP Sharad Pawar: मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
  • BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट

  • महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युतीवर शिक्कामोर्तब केले असून दुसरीकडे राष्ट्र

  • ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादीतला पेच कुठं अडलाय याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement