छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील बिडकीन येथे रमेश भारती हे गेल्या सहा वर्षांपासून माऊली वडापाव सेंटर चालवत आहेत. त्यांच्या चविष्ट मसाल्यामुळे आणि चटकदार वडापावमुळे दररोज 900 ते 1000 वडापाव विक्री होतात. इतकेच नव्हे तर आसपासच्या गावातूनही ग्राहक खास त्यांच्या वडापावसाठी येतात. या वडापाव सेंटरच्या माध्यमातून भारती यांची महिन्याला तीन लाखांची उलाढाल होत असून खर्च वजा करून 90 हजार रुपये कमाई होत असल्याचे व्यावसायिक रमेश भारती यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
Last Updated: November 26, 2025, 14:36 IST