छत्रपती संभाजीनगर : चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यांची सुरक्षितता हा मोठा प्रश्न बनला आहे. पूर्वी चावी तोडून किंवा लॉक फोडून गाडी चोरण्याच्या घटना घडत असत. मात्र आता स्मार्ट फिचर्स असलेल्या आधुनिक कारमध्ये पारंपरिक पद्धतीने चोरी करणे अवघड झाले आहे. तरीही चोरटेही तितकेच तंत्रज्ञानसज्ज झाले असून, सिस्टीम हॅक करून महागड्या गाड्या लंपास करण्याचे प्रकार काही ठिकाणी घडले आहेत.



