advertisement

Vijay Crishna Death: बॉलिवूडवर शोककळा! शाहरुख खानच्या ऑनस्क्रीन वडिलांचे निधन, 'या' सिनेमात साकारली मोठी भूमिका

Last Updated:

Vijay Crishna Death: आपल्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाने आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या विजय कृष्णा यांच्या निधनामुळे कलाविश्वात आणि उद्योग विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

News18
News18
मुंबई : भारतीय रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि उद्योग जगताला जोडणारा एक भक्कम दुवा आज निखळला आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्य क्षेत्रातील दिग्गज विजय कृष्णा यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. आपल्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाने आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या विजय कृष्णा यांच्या निधनामुळे कलाविश्वात आणि उद्योग विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केले नसले, तरी वाढत्या वयाशी संबंधित आजारपणामुळे त्यांची प्राणज्योत मालवल्याचे समजते.
विजय कृष्णा हे केवळ एक नाव नसून ते अभिनयाची एक शाळा होते. संजय लीला भंसाली यांच्या 'देवदास' चित्रपटात त्यांनी शाहरुख खानच्या वडिलांची, म्हणजेच 'नारायण मुखर्जी' यांची अविस्मरणीय भूमिका साकारली होती. याशिवाय 'गुजारिश', 'पीके' आणि जागतिक स्तरावर गाजलेल्या 'गांधी' चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. लिलेट दुबे यांच्या 'डान्स लाईक अ मॅन' या नाटकात त्यांनी सलग २५ वर्षांहून अधिक काळ भूमिका साकारली. हे नाटक भारतीय रंगभूमीवरील सर्वात यशस्वी नाटकांपैकी एक मानले जाते.
advertisement

कॉर्पोरेट विश्वातही मोठे नाव

विजय कृष्णा हे केवळ अभिनयातच निपुण नव्हते, तर कॉर्पोरेट विश्वातही त्यांचे मोठे नाव होते. ते 'गोदरेज' समूहाचे कार्यकारी संचालक म्हणून दीर्घकाळ कार्यरत होते. २०२१ मध्ये वयोमानामुळे त्यांनी या पदावरून निवृत्ती स्वीकारली होती. त्यांची पत्नी स्मिता गोदरेज कृष्णा या प्रसिद्ध उद्योजिका आहेत, तर मुलगी नायरिका होळकर या देखील उद्योग क्षेत्रात सक्रिय आहेत. कला आणि व्यापार या दोन भिन्न टोकांच्या जगाला त्यांनी अतिशय सुसंस्कृतपणे हाताळले होते.
advertisement
विजय कृष्णा यांच्या जाण्याने त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री लिलेट दुबे यांनी इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांनी लिहिले, "आमच्या रंगभूमी कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आणि २५ वर्षांहून अधिक काळ 'डान्स लाईक अ मॅन' असलेले आमचे लाडके विजय कृष्णा आता आपल्यात नाहीत. ते केवळ एक उत्तम अभिनेतेच नव्हते, तर अतिशय हजरजबाबी आणि देखणे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या आठवणींनी आज मन भरून आलंय."
advertisement
advertisement
या पोस्टवर अनुपम खेर, सबा पतौडी आणि जुही सोनी यांसारख्या कलाकारांनी कमेंट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Vijay Crishna Death: बॉलिवूडवर शोककळा! शाहरुख खानच्या ऑनस्क्रीन वडिलांचे निधन, 'या' सिनेमात साकारली मोठी भूमिका
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement