वर्धा: अनेकांची सकाळ गरमागरम चहासोबत होत असली तरी कॉफीचे चाहतेही कमी नाहीत. कामाचा कंटाळा आला की मूड फ्रेश होण्यासाठी अनेकांची पसंती कॉफीला असते. पण हीच कॉफी चेहऱ्याला लावून तुम्ही तजेलदारपणा मिळवू शकता. बहिणभावाच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय. सणाच्या दिवशी प्रत्येकाला आपला चेहरा सुंदर दिसावा असं वाटत असेल. तर तुम्ही कॉफीचे हे 5 फेसपॅक ट्राय करू शकता. याबाबत वर्धा येथील ब्युटीशियन प्रीती खडसे यांनी माहिती दिलीय.



