...अन् पती निघाला 'मित्राचा' दिवाना! लग्नाच्या 4 महिन्यातच घडलं भयंकर, छत्रपती संभाजीनगर हादरलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पतीला तिचा स्पर्शही व्हायचा नकोसा, 4 महिन्यांनी घराच्या भिंतींआडचं 'ते' भयाण सत्य आलं बाहेर! संभाजीनगर हादरलं
थाटामाटत लग्न झालं, सुखी संसाराला सुरुवात होण्याआधीच नवसाचं कारण पुढे आलं. पत्नी शरीर संबंध ठेवायला जवळ आली की तिला नवस आहे असं सांगितलं जायचं, एक महिना उलटला, दोन महिने उलटले, नंतर मात्र तिला काहीतरी वेगळं असल्याचा संशय येऊ लागला. प्रत्येकवेळी पतीजवळ गेल्यावर त्याला घाम फुटायचा आणि तो शारीरिक संबंध ठेवायला टाळाटाळ करायचा. याबद्दल सासरचेही चकार शब्द काढत नव्हते, सगळ्यांची आळीमिळी गुप चिळी होती. अखेर तिच्या डोळ्यातलं एक कोडं सुटलं, अखेर सप्टेंबर महिन्यात लग्नाच्या चार महिन्यांनंतर तिला जे सत्य समजलं त्याने भयंकर धक्का बसला.
गवागवा करून इतकं लग्न केलं खरं पण त्या लग्नाचं अस्तित्व केवळ मांडवापुरतंच मर्यादित होतं. मे २०२५ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या एका सुशिक्षित तरुणीला तिच्या पतीने 'नवसाचा' बहाणा सांगून शारीरिक संबंधांपासून दूर ठेवलं. 'माझा देवाला नवस आहे' असं सांगून तो टाळाटाळ करत होता, मात्र हा नवस नसून त्याच्यातील 'नपुंसकत्व' लपवण्यासाठी रचलेला एक क्रूर कट होता. ज्या नात्यात विश्वास असायला हवा, तिथे केवळ खोट्या देवाची शपथ घेऊन एका तरुणीचं आयुष्य अंधारात ढकललं गेलं.
advertisement
मे 2025 मध्ये लग्न झालं त्यानंतर चार महिन्यातच हे सगळं भयंकर सत्य तिला समजलं. तू माहेरातून 15 लाख आण तरंच मी तुझ्याशी बोलेन, तरच तुझ्याशी सुखी संसार करेन अशी धमकी सासरच्यांनी आणि पतीने द्यायला सुरुवात केली. तिने गायनॅकलॉजिस्टकडे जाण्याचा हट्ट धरला, मात्र पतीला घाम फुटला. सगळं गौरबंगाल पत्नीला समजलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. नवस हा तर फक्त एक बहाणा होता. प्रत्यक्षात तो पुरुषच नव्हता. त्याचा कधीच इंटरेस्ट तिच्यात नव्हता. मात्र हे सगळ्यांनी मिळून तिच्यापासून लपवून ठेवलं होतं.
advertisement
पतीला त्याचा मित्र आवडत होता. इथेच सगळा घोळ झाला आणि तिला आपली फसवणूक झाली हे समजलं. पण हे सगळं कुटुंबियांना आणि पोलिसांना सांगण्याआधी मात्र सासरच्यांनी तिला भयंकर छळलं. सासरच्यांनी उलटं ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. जागा घेण्यासाठी 15 लाख रुपये मागितले. पीडित महिलेच्या पतीला तर त्याचाच नवरा आवडत होता. हे समजल्यानंतर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला, तिच्याकडे असलेले दागिने आणि पैसे हिसकावून घेण्यात आले. इथवरच हे सगळं थांबलं नाही तर तिने कुठेही जाऊन आपली ओळख बदलू नये किंवा नोकरी करु नये म्हणून तिची सगळी कागदपत्र पळवून नेण्यात आली.
advertisement
त्यात सासरकडून होणारा सतत मानसिक आणि शारीरिक छळ भयंकर होता. तिला डांबून ठेवलं जात होतं, मारहाण केली जात होती. तिची सोसण्याची मर्यादा संपली आणि अखेर तिने छावणी पोलिसात न्यायसाठी छाव घेतली. घडलेला संपूर्ण प्रकार तिने सविस्तर सांगितला. या सगळ्याची दखल पोलिसांनी तातडीनं घेतली. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर हादरुन गेलं आहे. छावणी पोलिसांनी या प्रकरणी सासू, दीर, नणंद यांच्यासह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 2:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
...अन् पती निघाला 'मित्राचा' दिवाना! लग्नाच्या 4 महिन्यातच घडलं भयंकर, छत्रपती संभाजीनगर हादरलं










