अलास्का चर्चेतून मोठा ट्विस्ट, पुतिन भेटीनंतर भारताच्या Tariffवर ट्रम्प महत्त्वाचे वक्तव्य; तीन आठवड्यांनंतर मी...

Last Updated:

Tariffs On India: अलास्कामधील ट्रम्प-पुतिन बैठकीनंतर भारतावर लादले जाणारे अतिरिक्त तेल शुल्क तात्पुरते थांबवण्यात आले आहे. रशियन तेल खरेदीवरून भारताशी उभा ठाकलेला अमेरिकेचा संघर्ष आता काहीसा मवाळ झाल्याचे संकेत मिळत आहेत.

News18
News18
अलास्का: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत अलास्का येथे झालेल्या ऐतिहासिक शिखर बैठकीनंतर रशियन कच्च्या तेलाची खरेदी करणाऱ्या देशांवर अतिरिक्त दुय्यम (secondary) शुल्क (tariffs) लादणार नसल्याचे संकेत दिले आहेत.या देशांमध्ये भारताचा देखील समावेश आहे. त्यामुळे या मुद्द्यावर त्यांची भूमिका काहीशी मवाळ झाल्याचे दिसत आहे.
रशियन तेल खरेदी केल्यामुळे ट्रम्प यांनी भारतावर 50% शुल्क लादले होते. जे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त होते. यामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले होते. ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला "डेड" (मृत) असेही म्हटले होते. भारताने हे शुल्क अन्यायकारक आणि अवाजवी असल्याचे सांगत त्यांचा विरोध केला होता.
अलास्का येथे पुतिन यांना भेटण्यासाठी जाताना ट्रम्प यांनी एअर फोर्स वन विमानातून फॉक्स न्यूजला सांगितले की, त्यांनी शुल्क लादल्यामुळे रशियाने भारतासारखा तेल ग्राहक गमावला आहे आणि त्यामुळे त्यांना कदाचित कोणतेही दुय्यम शुल्क लादण्याची गरज भासणार नाही.
advertisement
ट्रम्प म्हणाले, त्यांनी एक तेल ग्राहक गमावला आहे, असे म्हणता येईल. तो म्हणजे भारत होय; जो सुमारे ४० टक्के तेल घेत होता. तुम्हाला माहीत आहे चीनने खूप तेल घेत आहे... आणि जर मी दुय्यम निर्बंध किंवा दुय्यम शुल्क लादले तर त्यांच्या दृष्टिकोनातून ते खूप विनाशकारी ठरेल. जर मला ते करावे लागले तर मी ते करीन. कदाचित मला ते करण्याची गरज भासणार नाही.
advertisement
मात्र भारताने स्पष्ट केले आहे की ट्रम्प यांच्या दंडात्मक उपायांमुळे रशियन तेल आयातीवर कोणताही परिणाम झालेला नाही. अलास्का येथील चर्चा चांगली झाली नसती, तर भारताला अतिरिक्त दुय्यम शुल्काचा फटका बसला असता, अशी भीती व्यक्त केली जात होती.
‘त्याबद्दल विचार करावा लागू शकतो…’
अलास्कामधील जॉइंट बेस एल्मेंडोर्फ-रिचर्डसन येथे पुतिन यांच्यासोबत जवळपास तीन तास चर्चा झाल्यानंतर ट्रम्प यांना पुन्हा एकदा रशियाकडून तेल आयात करणाऱ्या देशांवरील दुय्यम शुल्काविषयी विचारले गेले.
advertisement
फॉक्स न्यूजचे होस्ट शॉन हॅनिटी यांनी विचारले, भारत तुमचे तेल खरेदी करत नाही. युरोपियन युनियन ते खरेदी करणार नाही. माझ्या मनात हे का येत आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील संभाव्य शुल्क वाढ पुढे ढकलली? मला असे का वाटते की कदाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे पुढे विचार करत होते की, गरज पडल्यास, हा (दुय्यम शुल्काचा) परिणाम होऊ शकतो?
advertisement
यावर ट्रम्प यांनी उत्तर दिले, आज जे काही घडले. त्यामुळे मला वाटते की आता मला त्याबद्दल विचार करण्याची गरज नाही. कदाचित मला दोन किंवा तीन आठवड्यांनंतर त्याबद्दल विचार करावा लागेल. पण आता आपल्याला त्याबद्दल विचार करण्याची गरज नाही. मला वाटते की, बैठक खूप चांगली झाली.
ट्रम्प आणि पुतिन यांच्या या बहुप्रतिक्षित बैठकीतून युक्रेनमधील युद्धावर तोडगा काढण्यासाठी किंवा युद्ध थांबवण्यासाठी कोणताही करार झाला नाही. मात्र दोन्ही नेत्यांनी ही चर्चा फलदायी असल्याचे वर्णन केले.
advertisement
भारतावरील शुल्काबाबत अमेरिकेचा इशारा
बुधवारी अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी सांगितले होते की- ट्रम्प आणि पुतिन यांच्यात शिखर बैठकीत गोष्टी चांगल्या झाल्या नाहीत तर रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर लादलेले दुय्यम निर्बंध वाढू शकतात.
बेसेंट यांनी ब्लूमबर्गला सांगितले, मला वाटते की प्रत्येकजण राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यामुळे निराश झाला आहे. आम्हाला अपेक्षा होती की ते अधिक चांगल्या प्रकारे चर्चा करतील. असे दिसते की ते आता वाटाघाटीसाठी तयार आहेत. आणि आम्ही रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतीयांवर दुय्यम शुल्क लादले आहे. आणि मला असे दिसते की- जर गोष्टी चांगल्या झाल्या नाहीत, तर निर्बंध किंवा दुय्यम शुल्क वाढू शकतात.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
अलास्का चर्चेतून मोठा ट्विस्ट, पुतिन भेटीनंतर भारताच्या Tariffवर ट्रम्प महत्त्वाचे वक्तव्य; तीन आठवड्यांनंतर मी...
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement