मोदी-पुतिन यांची गाडीतच 50 मिनिटं गुप्त चर्चा, जगाला धक्का देणारी सीक्रेट मीटिंग; हा संवाद इतरांच्या कानावर येणार नाही

Last Updated:

Narendra Modi- Vladimir Putin: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात तब्बल तासभर गाडीतच गुप्त चर्चा झाली. या चर्चेमुळे जागतिक राजकारणात खळबळ माजली आहे.

News18
News18
बीजिंग: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जवळपास 10 मिनिटे वाट पाहिली, जेणेकरून दोघे मिळून शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेच्या स्थळापासून काही अंतरावर आयोजित द्विपक्षीय चर्चेसाठी निघू शकतील. मिळालेल्या माहितीनुसार, पुतिन यांना SCO परिषद स्थळावरून मोदींसोबत प्रवास करायचा होता. त्यासाठी त्यांनी चीनमधील तियानजिन येथे स्थळाबाहेर पंतप्रधान मोदींची प्रतीक्षा केली.
advertisement
पंतप्रधान मोदी आल्यानंतर दोघेही एकाच गाडीतून त्यांच्या द्विपक्षीय बैठकीच्या स्थळाकडे रवाना झाले. त्यांनी प्रवासासाठी पुतिन यांची AURUS लिमोझिन वापरली.
Prime Minister Narendra Modi with Russian President Vladimir Putin during a bilateral meeting on the sidelines of the SCO Summit in China (@narendramodi/X)
advertisement
प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांनी विविध विषयांवर संवाद साधला. इतकेच नव्हे तर बैठकीच्या स्थळी पोहोचल्यानंतरही त्यांनी जवळपास 45 मिनिटे गाडीतच बसून चर्चा सुरू ठेवली.
advertisement
यानंतर पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट करत लिहिले की- SCO शिखर परिषदेनंतर अध्यक्ष पुतिन आणि मी एकत्र गाडीतून आमच्या द्विपक्षीय बैठकीच्या स्थळी गेलो. त्यांच्याशी संवाद नेहमीच उपयुक्त आणि विचारप्रवर्तक ठरतो.
advertisement
रशियाच्या राष्ट्रीय रेडिओ स्टेशन VestiFM ने सांगितले की, दोन्ही नेते हॉटेलकडे जात असताना एकांतात संवाद साधत होते. जिथे नंतर त्यांच्या प्रतिनिधी मंडळातील सदस्य सामील होणार होते. मात्र हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतरही त्यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांच्या लिमोझिनमधून बाहेर पडण्याऐवजी आणखी 50 मिनिटे चर्चा सुरूच ठेवली.
advertisement
नंतर क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनीही पुष्टी केली की- दोन्ही नेत्यांनी गाडीत जवळपास एका तासभर tet-a-tet (एकांतात) चर्चा केली असे वृत्त PTI वृत्तसंस्थेने दिले आहे.
advertisement
मॉस्कोमधील काही विश्लेषकांनी असेही म्हटले की- कदाचित हीच मोदी आणि पुतिन यांच्यातील सर्वात महत्त्वाची आणि गोपनीय चर्चा ठरली असावी. ज्यामध्ये त्यांनी इतरांच्या कानावर न आणावयाचे मुद्दे मांडले असावेत.
यानंतर झालेल्या द्विपक्षीय चर्चेत पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना स्पष्ट संदेश दिला की- युक्रेन संघर्ष लवकरात लवकर थांबवणे ही मानवतेची मागणी आहे. तसेच मोदींनी हेही नमूद केले की, भारत रशियन अध्यक्षांच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
मोदी-पुतिन यांची गाडीतच 50 मिनिटं गुप्त चर्चा, जगाला धक्का देणारी सीक्रेट मीटिंग; हा संवाद इतरांच्या कानावर येणार नाही
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement