एअर फोर्सचं विमान शाळेवर कोसळलं; विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोरच भीषण दुर्घटना, Video

Last Updated:

Bangladesh Aircraft Crashed: ढाक्यात सोमवारी एक मोठा विमान अपघात झाला आहे. बांगलादेश एअर फोर्सचं F-7 BGI प्रशिक्षण विमान थेट शाळेच्या कॅम्पसवर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

News18
News18
ढाका : बांगलादेशची राजधानी ढाक्याच्या उत्तरा भागात सोमवारी दुपारी एअर फोर्सचं F-7 BGI हे प्रशिक्षण विमान स्कूल कॅम्पसमध्ये कोसळल्याची माहिती इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स डिरेक्टोरेट (ISPR) ने दिली आहे.
बांगलादेशी वृत्तसंस्थेनुसार, हे विमान दुपारी 1:06 वाजता उड्डाण केल्यानंतर काही वेळातच उत्तरा येथील निवासी भागात कोसळले. फायर सर्व्हिस आणि सिव्हिल डिफेन्सच्या माहितीनुसार, या अपघातात किमान तिघांचा मृत्यू  तर 100 हून अधिकजण जखमी झाले आहेत.
‘प्रथम आलो’ शी बोलताना फायर सर्व्हिस कंट्रोल रूमच्या ड्युटी ऑफिसर लीमा खान यांनी सांगितले की, अपघातानंतर चार जखमींना कंबाइंड मिलिटरी हॉस्पिटल (CMH) मध्ये दाखल करण्यात आले. हा अपघात अंदाजे दुपारी 1:30 च्या सुमारास घडल्याची माहिती देण्यात आली.
advertisement
प्राथमिक वृत्तानुसार, F-7 BGI हे विमान माइलस्टोन कॉलेजच्या कॅंटीनच्या छपरावर कोसळले. फायर सर्व्हिसचे तीन युनिट्स घटनास्थळी तातडीने दाखल झाले असून त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे.
bdnews24 या संस्थेने फायर सर्व्हिस सेंट्रल कंट्रोल रूमच्या ड्युटी ऑफिसर लीमा खानम हिचा हवाला देत सांगितले की, प्रशिक्षण विमान डायाबारीतील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजवर कोसळले. आमच्या पथकाने एका मृतदेहाचा शोध घेतला असून, एअर फोर्सने चार जखमींना ताब्यात घेऊन रुग्णालयात हलवले आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातग्रस्त पायलटबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
advertisement
ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या उत्तरा विभागाचे डेप्युटी कमिशनर मोहिदुल इस्लाम यांनी सांगितले की, माझ्याकडे या घटनेची माहिती मिळाली असून मी घटनास्थळी जात आहे, असे बांगलादेशी वेबसाईटने वृत्त दिले आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
एअर फोर्सचं विमान शाळेवर कोसळलं; विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोरच भीषण दुर्घटना, Video
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement