अमेरिकेवर इतिहासातील सर्वात मोठा Cyber ​​Attack, चीनच्या हॅकर्सनी ट्रम्प यांचा डेटा चोरला; ‘सॉल्ट टायफून’ हल्ल्याने जगभरात खळबळ

Last Updated:

Chinese Hackers Stole US Data: अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सायबर हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. चीनच्या ‘सॉल्ट टायफून’ हॅकर गटाने थेट ट्रम्प आणि उपराष्ट्रपतींपर्यंतचा डेटा हॅक केल्याने सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

News18
News18
वॉशिंग्टन : अमेरिका मध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला समोर आला आहे आणि आरोप थेट चीनवर लावले जात आहेत. रिपोर्ट्सनुसार चीन-आधारित हॅकर ग्रुप ‘सॉल्ट टायफून’ (Salt Typhoon) ने केवळ अमेरिकी जनतेचा डेटा चोरला नाही तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वेंस यांच्यासारख्या नेत्यांचा डेटा देखील हॅक केला आहे.
advertisement
इतका मोठा सायबर हल्ला कसा झाला?
या हल्ल्याची माहिती पहिल्यांदा डिसेंबर २०२४ मध्ये समोर आली होती. तेव्हा अनेक आंतरराष्ट्रीय मीडिया एजन्सींनी खुलासा केला की चीनी हॅकर्सनी अमेरिकी टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कला ब्रेक केले आहे. याच्या मदतीने लाखो कॉल्स, टेक्स्ट मेसेजेस आणि युजर्सच्या वैयक्तिक फाईल्स चोरीस गेल्या. किमान आठ अमेरिकी टेलिकॉम कंपन्यावर या हल्ल्याचा परिणाम झाला आहे.
advertisement
सीनेट इंटेलिजन्स कमेटीचे चेअरमन मार्क वॉर्नर यांनी याला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात धोकादायक टेलिकॉम हॅक म्हटले. त्यांचे म्हणणे होते की हा हल्ला रशियन हॅकर्सच्या मागील हल्ल्यांपेक्षा अनेक पटींनी मोठा आहे.
किती धोकादायक होता हा सायबर अटॅक?
advertisement
अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, इटली, स्पेन यांसह अनेक देशांच्या तपास यंत्रणांनी शोधून काढले की हा हल्ला फक्त अमेरिकेत मर्यादित नव्हता. हॅकर्सनी जगातील ८० देशांमधील सरकारी, सैन्य, ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिंग नेटवर्कला लक्ष्य केले. ब्रिटिश तपास एजन्सीनुसार, चीनने जुन्या नेटवर्क वल्नरेबिलिटीचा फायदा घेऊन अमेरिकी टेलिकॉम कंपन्या हॅक केल्या आणि थेट कॉल ऐकणे, संदेश वाचणे आणि मोबाईल डिव्हाईसच्या स्थानिक फाईल्सपर्यंत प्रवेश मिळवला.
advertisement
एफबीआयच्या माजी सायबर चीफ सिंथिया कैसर यांनी सांगितले, मला वाटत नाही की कोणताही अमेरिकी या हल्ल्यातून वाचला असेल. याचा परिणाम प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला आहे.
निशाण्यावर ट्रम्प आणि वेंस
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्याचे शिकार राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वेंस सुद्धा झाले. रिपोर्ट्सनुसार, २०२४ च्या इलेक्शन कॅम्पेन दरम्यान त्यांच्या कम्युनिकेशनलाही हॅक करण्यात आले. एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले, हा केवळ एक हॅक नाही, तर आपल्या कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चरचे शस्त्रीकरण आहे.
advertisement
कोणी केला हल्ला?
तपासकांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला सॉल्ट टायफून (Salt Typhoon) नावाच्या चीनी हॅकर ग्रुपने केला. मायक्रोसॉफ्टच्या नामकरण नियमांनुसार, “टायफून” हा शब्द चीन-आधारित गटांसाठी वापरला जातो. या ग्रुपला पूर्वी Ghost Emperor आणि Famous Sparrow नावानेही ओळखले जायचे.
advertisement
रिपोर्ट्सनुसार हा ग्रुप चीनच्या गुप्तचर संस्था मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी (MSS) शी संबंधित आहे आणि अनेक वर्षांपासून अशा सायबर हल्ल्यांमध्ये गुंतलेला आहे.
तीन चीनी कंपन्यांची भूमिका
अमेरिका आणि त्याच्या सहयोगींनी दावा केला आहे की या ऑपरेशनमध्ये तीन चीनी प्रायव्हेट कंपन्या देखील सामील होत्या.
Huanyu Tianqiong Information Technology (बीजिंग)
Zhixin Ruijie Network Technology (सिचुआन)
Juxinhe Network Technology
अमेरिकेने जानेवारीत Juxinhe वर निर्बंध लावले होते. उर्वरित कंपन्यांवरही कारवाईची तयारी सुरू आहे.
का आहे हा हल्ला धोकादायक?
हा सायबर अटॅक थेट अमेरिकेच्या सुरक्षेवर वार आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चीन आता फक्त आर्थिक डेटा चोरीवर मर्यादित राहिला नाही, तर तो अमेरिकेच्या सैनिकी आणि राजकीय हालचालींवर लक्ष ठेवण्यात गुंतला आहे.
माजी सीआयए अधिकारी जेनिफर इवबॅंक यांनी सांगितले, दहा वर्षांपूर्वी चीन फक्त ट्रेड सीक्रेट्स चोरत होता. पण आता तो संयम आणि तांत्रिक क्षमतेसह ८० हून अधिक देशांच्या नेटवर्कमध्ये आतपर्यंत शिरला आहे. हे चीनच्या जागतिक महत्त्वाकांक्षेचे पुरावे आहेत.
मराठी बातम्या/विदेश/
अमेरिकेवर इतिहासातील सर्वात मोठा Cyber ​​Attack, चीनच्या हॅकर्सनी ट्रम्प यांचा डेटा चोरला; ‘सॉल्ट टायफून’ हल्ल्याने जगभरात खळबळ
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement