7 सेकंदात सगळं संपलं! सर्वात शक्तीशाली फायटर जेट F-16 बनलं आगीचा गोळा; अपघाताचा थरारक VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कॅलिफोर्नियातील ट्रोना परिसरात F-16C Fighting Falcon क्रॅश झाला, पायलटने सुरक्षितपणे इजेक्ट केले. अमेरिकन एअरफोर्सने तपास सुरू केला आहे. F-35 वर भर दिला जातो.
अत्यंत घातक आणि लढाऊ विमानांपैकी एक असलेले F-16 फायटर जेट कॅलिफोर्नियाच्या वाळवंटी भागात क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामुळे वाळवंटात विमान आगीचा गोळा बनलं. आगीचे लोळ आणि धूर दूरवर पसरले होते. मात्र, विमान जमिनीवर आदळण्यापूर्वीच हवाई दलाच्या वैमानिकाने सुरक्षितपणे बाहेर उडी मारलीआणि त्याचा जीव वाचला. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
अचानक खाली आले, मग झाला स्फोट
हा अपघात अमेरिकेच्या मोजावे डेझर्टमधील ट्रोना परिसरात घडला. प्रत्यक्षदर्शींनी आणि काही व्हिडिओमध्ये हे जेट वेगाने खाली येत असल्याचे स्पष्ट दिसते. जमिनीवर धडकताच विमानाचा मोठा स्फोट होऊन आगीचे लोळ उठले. अमेरिकेच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, F-16C Fighting Falcon हे विमान आज सकाळी सुमारे १०.४५ वाजता एका ट्रेनिंग मिशनदरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले. अपघात स्थळ लॉस एंजेलिसपासून सुमारे १८० मैल दूर आहे.
advertisement
Meanwhile in California
US Military Thunderbird Plane Crash - Pilot ejected to safety.
Planes never ever used to crash this much. pic.twitter.com/kL3HHhptzg
— Concerned Citizen (@BGatesIsaPyscho) December 3, 2025
पायलट सुरक्षित, सध्या रुग्णालयात
अपघात होताच अग्निशमन विभागाला तातडीने 'एअरक्राफ्ट इमर्जन्सी'चा अलर्ट मिळाला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैमानिकाने योग्य वेळी 'इजेक्ट' करत पॅराशूटच्या मदतीने सुरक्षित लँडिंग केले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने त्याला कोणताही जीवघेणा दुखापत झालेली नाही. वैमानिकाचे आरोग्य धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळत आहे.
advertisement
अपघातामागचे नेमके कारण काय? तपास सुरू
F-16 फायटर जेट क्रॅश होण्यामागे नेमके काय कारण होते? तांत्रिक बिघाड झाला की अन्य काही समस्या होत्या? याबाबत सध्या कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी हवाई दलाने तात्काळ तपास सुरू केला आहे. गेल्या काही वर्षांत अमेरिकेतील अनेक फायटर जेट अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. २०२० मध्ये याच भागात नेव्हीचे F/A-18E सुपर हॉर्नेट कोसळून वैमानिकाचा मृत्यू झाला होता, याची आठवण या निमित्ताने झाली.
advertisement
नव्या विमानांवर भर
view commentsजागतिक स्तरावरच्या या लढाऊ विमानांच्या अपघातांमुळे अमेरिकेने आता आपल्या हवाई दलातील विमानांच्या ताफ्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या अमेरिकन एअरफोर्स F-16 सारख्या जुन्या विमानांपेक्षा F-35 सारख्या अत्याधुनिक आणि नव्या पिढीच्या विमानांवर अधिक भर देत असल्याचे बोलले जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2025 10:03 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
7 सेकंदात सगळं संपलं! सर्वात शक्तीशाली फायटर जेट F-16 बनलं आगीचा गोळा; अपघाताचा थरारक VIDEO


