China Army: चीनच्या टेस्टने सर्वांना घाबरवलं, अमेरिकेच्या सुरक्षेलाही धक्का; ट्रिपल हिटने जगात खळबळ, भारताला मोठा इशारा

Last Updated:

China Triple Strike Experiment: चीनच्या ‘ट्रिपल न्यूक्लियर स्ट्राइक’ प्रयोगाने भारतासाठी मोठा इशारा दिला आहे. दक्षिण आशियातील रणनीतिक संतुलन ढासळू शकतं, त्यामुळे भारताला संरक्षण अधिक बळकट करावं लागणार आहे.

News18
News18
बीजिंग: चीनच्या लष्कराने (PLA) प्रयोगशाळेत एक भीषण प्रयोग केला आहे. पीएलएच्या वैज्ञानिकांनी पहिल्यांदाचट्रिपल-न्यूक्लियर स्ट्राइककरून दाखवले आहे. म्हणजे आता फक्त एकाच वॉरहेडवर नाही, तर हलत्या क्लस्टरप्रमाणे एकामागून एक किंवा एकत्रच डागलेले लहान-लहान कमी क्षमतेचे वॉरहेड्स स्फोट करतील.
advertisement
आतापर्यंत जगभरात एकाच वॉरहेडवर संशोधन झाले होते आणि जे अस्त्र विकसित झाले होते, तेही फक्त सिंगल वॉरहेडवर आधारित होते. पण चीनने हे अनेक पटींनी पुढे नेले असून हा नवा प्रयोग अण्वस्त्रांना अत्यंत घातक बनवतो. साध्या भाषेत सांगायचं तर, जर तीन लहान अण्वस्त्र वॉरहेड्स जवळपास एकत्रच फुटले, तर किती मोठा विध्वंस होईल हे सहज कल्पना करता येईल. सांगितले जात आहे की चीन हा शस्त्रप्रकार विशेषतः बंकर नष्ट करण्यासाठी तयार करत आहे. मात्र यामुळे अमेरिका हादरलेली आहे.
advertisement
नानजिंगमधील प्रयोग
हा प्रयोग नानजिंग येथील आर्मी इंजिनियरिंग युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी केला असून त्याचा अहवाल Explosion and Shock Waves या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. वैज्ञानिकांनी हे तपासण्याचा प्रयत्न केला की- जर एकाच ठिकाणी एकाचवेळी जवळपास तीन छोटे अण्वस्त्र स्फोट झाले, तर काय परिणाम होतो. यासाठी नानजिंग पीएलए युनिव्हर्सिटीच्या टीमने छोटे-स्केल कंट्रोल प्रयोग केले. व्हॅक्युम चेंबर, दोन-स्टेज हाय-प्रेशर गॅस गन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी ‘ट्रिपल-हिटचा मॉडेल तयार केला आणि त्याची चाचणी घेतली. लहान प्रोजेक्टाईल्सनी काचेच्या प्रेशर बॉल्स फोडून अचानक प्रचंड ऊर्जा निर्माण केली, जी प्रत्यक्ष अण्वस्त्र स्फोटासारखीच होती.
advertisement
मिलीसेकंदात विध्वंस
या प्रयोगाची सर्वात भयानक बाब म्हणजे मिलीसेकंदात प्रचंड विध्वंस घडवता येतो. एका वॉरहेडच्या स्फोटानंतर दुसऱ्याच्या स्फोटात फक्त 0.8 मिलीसेकंदाचा फरक राहिला. म्हणजे एका मिलीसेकंदापेक्षाही कमी वेळात तीन स्फोट झाले. हे तिन्ही जवळपास एकत्रच झाले असल्याने त्याचा परिणाम अत्यंत भीषण होता. प्रयोगाचे निष्कर्ष थक्क करणारे होते. उदाहरणार्थ: 1965 च्या Palanquin चाचणीशी तुलना केली असता दिसून आले की, या नव्या ट्रिपल स्फोटामुळे दुपटीहून अधिक खोल आणि मोठा खड्डा तयार झाला. पृष्ठभागावरची नासधूसही अनेक पटींनी वाढली. साध्या शब्दांत सांगायचे तर तीन-हिट किंवा क्लस्टर्ड स्ट्राइक जमिनी आणि दगडांमध्ये अशा तरंगांची निर्मिती करतात की त्याचा एकत्रित परिणाम वेगवेगळ्या स्फोटांच्या बेरजेपेक्षा कितीतरी अधिक विध्वंसक असतो.
advertisement
का धोकादायक आहे हा प्रयोग?
हा फरक अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आजच्या काळात देश आपली महत्त्वाची लष्करी आणि अण्वस्त्र तळं जमिनीखाली ठेवतात. पारंपरिक बॉम्ब किंवा क्षेपणास्त्रांनी त्यांना नष्ट करणे शक्य होत नाही. उदाहरणार्थ- इराणमध्ये इस्रायलच्या मोठ्या प्रयत्नांनंतरही बंकर नष्ट झाले नाहीत. त्यानंतर अमेरिकेला बंकर-बस्टर बॉम्ब तयार करावा लागला.
advertisement
चीनचा हा प्रयोग जर प्रत्यक्ष शस्त्ररूपात बदलला तर तो अत्यंत भयानक विध्वंस घडवू शकतो. एका क्षणात संपूर्ण बंकर जमीनदोस्त होऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे हे शस्त्र लहान असल्याने चीन ज्या ठिकाणी हवे तिथे मर्यादित नुकसान घडवू शकेल. याला हायपरसोनिक किंवा इतर अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणालीतून डागता येईल. टाइम-सिंक कम्युनिकेशनमुळे हे अधिक ताकदवान ठरणार आहे. पण यातील मोठा धोका म्हणजे रेडिएशन, जे फार गंभीर परिणाम करू शकते.
advertisement
भारतासाठी याचा अर्थ काय?
भारतासाठी या प्रयोगाचा संदेश स्पष्ट आहे दक्षिण आशियातील रणनीतिक संतुलन बदलू शकते. भारताला आपल्या खोल बंकरांची, अण्वस्त्रांची आणि संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा अधिक मजबूत करावी लागेल. क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली, संशोधन-विकास (R&D), जलद ओळख आणि त्वरित प्रतिसाद यावर अधिक गुंतवणूक करावी लागेल. चीनची ही लॅब-रिपोर्ट भारतासाठी एक मोठा इशारा आहे.
नवी तंत्रज्ञानं फक्त शस्त्रं बदलत नाहीत, तर त्यांच्या वापराचे धोरण आणि परिघही बदलतात. त्यामुळे देशांनी आता वैज्ञानिक दृष्टिकोनासह रणनीतिक आणि राजकीय तयारी अधिक वेगाने करणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/विदेश/
China Army: चीनच्या टेस्टने सर्वांना घाबरवलं, अमेरिकेच्या सुरक्षेलाही धक्का; ट्रिपल हिटने जगात खळबळ, भारताला मोठा इशारा
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement