...तर अमेरिकेत आली असती मृत्यूची लाट, कोरोनानंतर पुन्हा चीनचा भयंकर कट? दोघांना अटक

Last Updated:

चीनच्या लॅबमधून कोरोना पसरल्यानंतर आता जीवघेणी बुरशी पकडली गेली आहे. जियान युनकिंग आणि लियू जुनयोंग यांना अटक झाली असून, ही बुरशी शेती आणि माणसांसाठी धोकादायक आहे.

News18
News18
चीनच्या लॅबमधून कोरोना व्हायरस पसरल्याचं जगासमोर आलं आणि हाहाकार उडाला. त्यानंतर पुन्हा एकदा चीनच्या कुरापती सुरू झाल्यात का असा संशय व्यक्त केला जात आहे. सर्वात जीवघेणी आणि कोरोनापेक्षाही भयंकर गोष्ट दोन तरुणांकडून पकडली. जर ही गोष्ट पसरली असती तर अमेरिकेत मृत्यूची लाट आली असती अशी भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनापेक्षाही खतरनाक बुरशी असल्याची माहिती मिळाली आहे.
लॅबमधून कोरोना पसरल्याच्या घटनेनंतरही चीन सुधारण्याचं नाव घेत नाही. जगभरात हाहाकार माजलेल्या कोरोनानंतर आता धोकादायक बुरशीमधून पुन्हा एकदा नवा व्हायरस पसरवण्याचा काम चीनकडून केलं जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अमेरिकेत दोन तरुणांना जीवघेण्या बुरशीसकट पकडण्यात आलं आहे. ही बुरशी इतकी भयंकर आहे की त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. सुरुवातीला ती शेती, फळबागांना नुकसान पोहोचवू शकते त्यापाठोपाठ माणसाच्या शरीरावरही गंभीर परिणाम करू शकते असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
advertisement
वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या रिपोर्टनुसार, जियान युनकिंग आणि लियू जुनयोंग यांना बुरशीजन्स पदार्थासकट अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. चीन आता शेती आणि त्यातून शेतकऱ्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे. या बुरशीचं नाव फ्यूजेरियम ग्रॅमिनियरम असल्याची माहिती मिळाली आहे. गहू, तांदूळ, मका या पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. शिवाय माणसाच्या लीवरवर गंभीर परिणाम करते, या बुरशीमुळे माणसांना उटल्या होतात.
advertisement
पकडण्यात आलेले दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असल्याचा दावा करत आहेत. सुरुवातीला त्यांनी खोटं सांगितलं, उडवा उडवीची उत्तरं दिली मात्र नंतर कसून चौकशी केल्यानंतर खरं काय आहे ते सांगितलं. ही बुरशी अत्यंत धोकादायक असल्याचं या दोघांनीही कबूल केलं आहे. त्यामुळे अमेरिकेतील प्रशासन आता सतर्क झालं आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
...तर अमेरिकेत आली असती मृत्यूची लाट, कोरोनानंतर पुन्हा चीनचा भयंकर कट? दोघांना अटक
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement