कुशीत लेक अन् मागे देवीची मूर्ती, तो फोटो ठरला अखेरचा! बांग्लादेशमध्ये हिंदू व्यापाऱ्याची हत्या
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बांगलादेशातील नरसिंदी जिल्ह्यात मणी चक्रवर्ती या हिंदू व्यापाऱ्याची चाकूने हत्या, २४ तासांत दुसरी घटना, अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण.
देवीचं दर्शन मागे देवीचा फोटो आणि सदैव आशीर्वाद असूदे मनातून येणारे भाव आणि लेकीला कडेवर घेऊन काढलेला तो सेल्फी अगदी शेवटचा ठरेल याची मनात पुसटशी देखील कल्पना नव्हती. हा सेल्फी शेवटचा ठरला अन् लेकीला आता कडेवर घेऊन खेळवणारा बाबाही पुन्हा कधीच भेटणार नाही. पित्याची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. बांगलादेशात नरसिंदी जिल्ह्यात एका हिंदू व्यापाऱ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. मागच्या २४ तासांत हिंदू समाजातील व्यक्तीची हत्या होण्याची ही दुसरी घटना आहे. यामुळे स्थानिक अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोमवारी रात्री एका हिंदू व्यापाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली, ज्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. चारसिंदूर बाजारपेठेत किराणा दुकान चालवणारे मणी चक्रवर्ती हे ५ जानेवारी रोजी रात्री १० च्या सुमारास आपल्या दुकानात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी अचानक हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
मणी चक्रवर्ती हे मदन चक्रवर्ती यांचे ज्येष्ठ पुत्र असून ते परिसरातील एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणून परिचित होते. या घटनेमुळे गेल्या काही दिवसांत बांगलादेशात हिंसाचाराला बळी पडलेल्या हिंदूंच्या मृतांची संख्या आता ६ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, जेसोरमधील गोळीबाराच्या घटनेनंतर अवघ्या २४ तासांत झालेली ही दुसरी हत्या असून अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. समोर आलेली ही आकडेवारी केवळ सार्वजनिक झालेल्या घटनांची असून, प्रत्यक्षात हिंदू समाजाला सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचे वास्तव समोर येत आहे.
advertisement
भरबाजारात चाकूने हल्ला मिळालेल्या माहितीनुसार, मणी चक्रवर्ती हे पलाश उपजिल्ह्यातील चारसिंदूर बाजार परिसरात किराणा दुकान चालवत होते. सोमवारी रात्री ते आपल्या दुकानात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
advertisement
२४ तासांतील दुसरी घटना
याआधी ५ जानेवारी रोजी जेसोर जिल्ह्यातील मोनिरामपूर येथे राणा प्रताप बैरागी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सायंकाळच्या सुमारास कपालिया बाजारात त्यांच्यावर गोळीबार झाला होता. एकामागून एक घडलेल्या या दोन हत्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हिंसाचाराची मालिका सुरूच मानवाधिकार संघटनांच्या अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांत बांगलादेशातील अल्पसंख्याक समाजावर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.
advertisement
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
view commentsडिसेंबर २०२५ मध्ये मैमनसिंह येथे दीपू चंद्र दास, बजेंद्र बिस्वास आणि अमृत मंडल यांच्या हत्या झाल्या होत्या. तर जानेवारी २०२६ च्या सुरुवातीलाच शरियतपूरमध्ये खोकोन दास नावाच्या व्यक्तीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. भारताने या सातत्याने होणाऱ्या हत्यांबाबत बांगलादेशच्या अंतरिम सरकारकडे तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अल्पसंख्याक हिंदू समाजाच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी भारताकडून करण्यात आली आहे.
Location :
Delhi
First Published :
Jan 06, 2026 9:02 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
कुशीत लेक अन् मागे देवीची मूर्ती, तो फोटो ठरला अखेरचा! बांग्लादेशमध्ये हिंदू व्यापाऱ्याची हत्या








