युक्रेन युद्धाचा खरा सूत्रधार कोण? पुतिन यांनी थेट नाव घेतले; युरोप हादरला, अमेरिकन राजकारणात खळबळ

Last Updated:

Putin On Ukraine War: अलास्का बैठकीत पुतिनने धक्कादायक दावा करत सांगितले की- जर 2022 मध्ये ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असते तर युक्रेन युद्ध कधीच पेटले नसते. या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.

News18
News18
अलास्का: रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अलास्का येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत पाच वर्षांनंतर झालेल्या पहिल्याच प्रत्यक्ष भेटीत सांगितले की, जर 2022 मध्ये ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असते, तर युक्रेनमधील संघर्ष कधीच सुरू झाला नसता. ट्रम्प यांनी अनेकदा दावा केला आहे की जर ते व्हाईट हाऊसचे प्रमुख असते, तर रशिया-युक्रेन युद्ध झालेच नसते. यावर पुतिन यांनी ट्रम्प यांच्या मताला पाठिंबा दिला.
पुतिन म्हणाले की, त्यांनी बायडेन यांना अशा कृतींबद्दल सावध केले होते, ज्यामुळे परिस्थिती इतकी बिघडू शकते की लष्करी कारवाईच्या स्वरूपात गंभीर परिणाम होऊ शकतात. मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की- 2022 मध्ये मागील प्रशासनाशी झालेल्या आमच्या शेवटच्या संपर्कादरम्यान मी माझ्या मागील अमेरिकन सहकाऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता की परिस्थिती युद्धापर्यंत पोहोचू नये. जेथून मागे फिरता येणार नाही. आणि तेव्हा मी हे अगदी स्पष्टपणे सांगितले होते की ही एक मोठी चूक होती.
advertisement
अलास्का चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी या भेटीला विधायक (constructive) असे वर्णन केले. पुतिन यांनी या ठिकाणाला आपल्या देशांच्या सामायिक इतिहासाच्या दृष्टीने एक तार्किक ठिकाण असे म्हटले.
पुतिन म्हणाले की, त्यांनी आणि ट्रम्प यांनी खूप चांगला, व्यावसायिक आणि विश्वासार्ह संपर्क प्रस्थापित केला आहे. ते पुढे म्हणाले की, असा दृष्टिकोन युक्रेन संघर्ष संपुष्टात आणण्यास मदत करेल. हे जितक्या लवकर होईल तितके चांगले.
advertisement
advertisement
त्यांनी ट्रम्प यांच्या संभाषणाच्या मैत्रीपूर्ण पद्धतीचे कौतुक केले आणि सांगितले की अमेरिका-रशिया संबंधांमध्ये पूर्वीच्या अडचणी असूनही परिस्थिती सुधारणे महत्त्वाचे आहे.
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील अलास्का येथे झालेल्या या अत्यंत महत्त्वाच्या शिखर परिषदेत युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी किंवा संपुष्टात आणण्यासाठी कोणताही महत्त्वपूर्ण तोडगा निघाला नाही. 1945 नंतर युरोपमधील हा सर्वात भीषण संघर्ष असून आता तो चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे.
advertisement
जवळपास तीन तास बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकारांसमोर थोड्या वेळासाठी हजेरी लावली आणि अनेक मुद्द्यांवर प्रगती झाल्याचे सांगितले. परंतु कोणताही विशिष्ट तपशील दिला नाही आणि प्रश्न घेण्यास नकार दिला.
संयुक्त पत्रकार परिषद संपवताना, पुतिन यांनी मॉस्कोमध्ये दुसऱ्या फेरीची चर्चा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी आशा व्यक्त केली की कीव्ह आणि युरोपातील राजधानी शहरे या सर्वाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतील आणि कोणत्याही अडथळ्यांना किंवा पडद्यामागील कटकारस्थानांना परवानगी देणार नाहीत. ट्रम्प यांनीही दुसऱ्या भेटीची शक्यता नाकारली नाही आणि म्हणाले, मी ते शक्य झाल्याचे पाहू शकतो.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
युक्रेन युद्धाचा खरा सूत्रधार कोण? पुतिन यांनी थेट नाव घेतले; युरोप हादरला, अमेरिकन राजकारणात खळबळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement